बंगाल अद्यापही 19 व्या शतकातच... - Bengal still living in 19th century under 'decades of misrule' by TMC, Left: Rajnath Singh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

बंगाल अद्यापही 19 व्या शतकातच...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

संपूर्ण भारत 21 व्या शतकात आहे. परंतु, केवळ पश्चिम बंगालच अजूनही 19 व्या शतकात वावरत असून विकासाला खीळ बसली आहे. याला सर्वस्वी तृणमूल काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशातशा राजकारण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते. 27 मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. अगदी काही तासांवर पश्चिम बंगालमधील निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असल्याने वातावरण चांगलेच पेटले आहे. पश्चिम बंगाल अद्यापही 19 व्या शतकातच असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक दशकांच्या गैरव्यवहाराचे हे फळ आहे, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. 

पश्चिम बंगालमधील जोयपूर जिल्ह्यात प्रचार सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, संपूर्ण भारत 21 व्या शतकात आहे. परंतु, केवळ पश्चिम बंगालच अजूनही 19 व्या शतकात वावरत असून विकासाला खीळ बसली आहे. याला सर्वस्वी तृणमूल काँग्रेसच जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमुळेच पाणी-बाणी आहे. आम्ही सत्तेवर आल्यास 2024 अखेरपर्यंत घराघरात पाणी मिळेल, असेही ते म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 च्या पुढे जागा मिळतील. पश्चिम बंगालमधील जनता या निवडणुकीच्या निकालावरून ममता बॅनर्जी यांना दाखवून देईल की त्यांनी गेल्या 20 वर्षात काहीच केलेले नाही. भाजप सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षण, विधवांना तीन हजार रुपये पेन्शन, वीस लाख तरुणांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण, आदी गोष्टींची पूर्तता आम्ही करू. दरम्यान, 29 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल व 2 मे रोजी मतमोजणी होईल. 294 जागांकरिता मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात  30 जागांसाठी मतदान होईल.       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख