लॉकडाउन करा! 'टास्क फोर्स'ने मोदी सरकारला संसर्ग वाढण्यापूर्वीच केली होती शिफारस

टास्क फोर्सने १५ एप्रिलला सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती.
 Balram Bhargava says the country needs a lockdown of at least six to eight weeks .jpg
Balram Bhargava says the country needs a lockdown of at least six to eight weeks .jpg

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. तर अनेक राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात आहे. दुसरीकडे देशातही लॉकडाउन जाहीर करावा, अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR ) प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचे विधान केले. (Balram Bhargava says the country needs a lockdown of at least six to eight weeks)

एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत भार्गव म्हणाले की, ''कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन (Lockdown) ठेवला पाहिजे, असे मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे, तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे अशा जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावला पाहिजे. पॉझिटिव्हिटी रुग्णसंख्येचा दर १० टक्क्यांहून पाच टक्क्यांवर आल्यानंतर सर्व काही सुरळीत करु शकतो. पण तसे झाले पाहिजे, आणि हे सहा ते आठ आठवड्यांमध्ये होणार नाही हे नक्की, असेही बलराम भार्गव यांनी सांगितले.

बलराम भार्गव यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली नाही, मात्र कोरोना संकटाला उत्तर देण्यास उशीर झाल्याचे त्यांनी मान्य केले. ''मला वाटते १० टक्क्यांची शिफारस मान्य करण्यास उशीर झाला. टास्क फोर्सने १५ एप्रिलला सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

टाळेबंदी ३१ मेपर्यंत दोन दिवसांत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

देशाच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुचा समावेश आहे.  दरम्यान, देशाला दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे, त्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर केला जावा अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र त्यासाठी इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिनामामुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, नवी दिल्ली, गोवा अशा अनेक राज्यांमध्ये निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com