'बाबा का ढाबा'च्या मालकाचे आधी मद्यप्राशन अन् नंतर खाल्ल्या झोपेच्या गोळ्या   - Baba Ka Dhaba owner admitted to Hospital after he consumed alcohol | Politics Marathi News - Sarkarnama

'बाबा का ढाबा'च्या मालकाचे आधी मद्यप्राशन अन् नंतर खाल्ल्या झोपेच्या गोळ्या  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जून 2021

कांता प्रसाद यांना रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) काळात प्रसिध्दीच्या झोतात आलेले 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी गुरूवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील मालवीय नगर भागात ते राहतात. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली. (Baba Ka Dhaba owner admitted to Hospital after he consumed alcohol) 

कांता प्रसाद यांना रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते 80 वर्षांचे आहेत. कांता प्रसाद यांचा मालवीय नगर भागातच छोट हॅाटेल होतं. कोरोना काळातमध्ये या ढाब्यावरील खाद्यपदार्थांची विक्री खूप कमी झाली होती. लॅाकडाऊन काळात तर ढाबा ठप्प झाला होता. त्यामुळं ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. 

हेही वाचा : भाजपची बाजू मांडणारे वकीलच आता न्यायाधीश; ममतांचा जय-पराजय ठरवणार

यूट्यूबर गौरव वासन यांनी त्यांच्या या परिस्थितीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला. या व्हिडीओमुळं कांता प्रसाद रातोरात स्टार बनले. व्हिडीओमुळं कांता प्रसाद यांच्या ढाब्यावरील गर्दी वाढू लागली. त्याचा फायदाही कांता प्रसाद यांना झाला. देशभरातून त्यांना मोठा प्रतिदास मिळाला. त्यांनी आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला. 

कांता प्रसाद यांनी सुरू केलं होतं रेस्टॅारंट

लॅाकडाऊननंतर कांता प्रसाद यांनी रेस्टॅारंट सुरू केलं होतं. पण सुरूवातीला मिळालेला प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागल्याने रेस्टॅारंट बंद करावं लागलं. पुन्हा ते आपल्या छोट्या हॅाटेलकडे वळले होते. 

गौरव वासन यांच्यासोबत वाद

गौरव वासन यांनी आपल्या नावाने देशभरातून पैसे कमविल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादानंतर बाबा का ढाबावर जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाली होती. कांता प्रसाद यांनी काही दिवसांनी गौरव यांची माफीही मागितली. त्यानंतर गौरव यांनी त्यांची नुकतीच प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीनंतर काही दिवसांतच कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख