भाजपच्या काळात ब्राम्हणांवर अत्याचार वाढल्याचे सांगत मायावतींनी केली मोठी घोषणा 

उत्तर प्रदेशात बसपने चारवेळा सत्ता मिळवली आहे. आता पक्षाची पाचव्यांदा सत्ता आणण्यासाठी मायावती यांनी कंबर कसली आहे.
Atrocities against Brahmins increased during BJP rule says Mayawati
Atrocities against Brahmins increased during BJP rule says Mayawati

लखनऊ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री व बसप प्रमुख मायावती यांनी मंगळवारी लखनऊमध्ये ब्राम्हण प्रबुध्द संमेलन घेत पुन्हा सोशल इंजिनिअरींगची चाचपणी सुरू केली आहे. संमेलनात बोलताना त्यांनी भाजपच्या काळात ब्राम्हणांवर अत्याचार वाढल्याची टीका केली आहे. (Atrocities against Brahmins increased during BJP rule says Mayawati)

उत्तर प्रदेशात बसपने चारवेळा सत्ता मिळवली आहे. आता पक्षाची पाचव्यांदा सत्ता आणण्यासाठी मायावती यांनी कंबर कसली आहे. ब्राम्हण संमेलनात बोलताना त्यांनी ब्राम्हण समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, भाजपच्या काळात ब्राम्हणांवर अत्याचार वाढले. सत्तेत आल्यानंतर ब्राम्हणांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी केली जाईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल. ब्राम्हणांचा सन्मान आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशा घोषणा मायावती यांनी केल्या आहेत. 

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक हजार ब्राम्हण कार्यकर्त्यांना तयार करून सर्वांना एकजूट करायचे आहे, असं आवाहनही मायावती यांनी यावेळी केलं. बसप सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय या विचाराने चालणारा पक्ष आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो. यावेळी बसपची सरकार सत्तेत येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ब्राम्हणांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्राम्हणांना हवीय भाजपपासून मुक्ती

भाजप व समाजवादी पक्षावर टीका करताना मायावती म्हणाल्या, आमचा पक्ष इतर पक्षांप्रमाणे हवेत गोष्टी करत नाही. धर्म-जातीच्या आधारावर आम्ही कुठल्याही समाजात भेदभावही करत नाही. बसप सरकारच्या काळात नेहमीच कायद्याचे राज्य राहिले आहे. 2012 मध्ये सपाने सत्तेत आल्यानंतर राज्याची स्थिती बिघडवली. तर 2017 मध्ये ब्राम्हण समाज भाजपच्या घोषणांना भुलला. पण त्या घोषणा अजून पूर्ण झाल्या नाहीत. आता ब्राम्हण समाजाला भाजपपासून मुक्ती हवी आहे, असं वक्तव्य मायावती यांनी केलं आहे. 

आता स्मारक पुतळे बास

मायावती यांची सत्ता असताना अनेक पुतळे व स्मारके, पार्क उभारण्यात आले होते. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप आहे. त्यावर अनेकांनी जोरदार टीकाही केली होती. त्यानंतर आता मायावती यांनी यापुढे स्मारक, पुतळे उभारण्याची गरज नाही. आता बसप सरकार आल्यास पूर्ण क्षमतेने राज्याचा विकास केला जाईल. पण जर काही जाती-धर्मातील लोकांनी तशी मागणी केली तर त्यांचा आदर केला जाईल, असंही मायावती यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com