माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंहा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

यशवंत सिंहा यांना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी कोणती महत्वाची जबाबदारी सोपवितात, हे लवकरच कळेल.
ys13.jpg
ys13.jpg

कोलकाता: माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंहा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला.  भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक वर्ष यशवंत सिंहा हे राजकारणापासून दूर होते. आज त्यांनी सकाळी कोलकाता येथे टीएमसीच्या कार्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 'टीएमसी'त प्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यशवंत सिंहा यांना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी कोणती महत्वाची जबाबदारी सोपवितात, हे लवकरच कळेल. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थंमंत्री होते. यशवंत सिंहा हे 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकात भूमिका घेऊन त्यांच्यावर टीका करीत आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत त्याचे चिंरजीव जयंत सिंहा हे अर्थराज्यमंत्री होते, तेव्हाही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. टीएमसीचे नेता सुब्रत मुखर्जी यांनी त्यांचे स्वागत केलं असून ते म्हणाले की आम्हाला गर्व आहे यशवंत सिंहा आमच्या पक्षात आले आहेत. 

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. 

बंगालमधील पक्षीय बलाबल  

तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

पश्चिम बंगाल : जागा - 294, टप्पे - 8, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल, टप्पा 4 - मतदान - 10 एप्रिल, टप्पा 5 - मतदान - 17 एप्रिल, टप्पा 6 - मतदान - 22 एप्रिल, टप्पा 7 - मतदान - 26 एप्रिल, टप्पा 8 - मतदान - 29 एप्रिल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com