धक्कादायक : निवडणूक सुरू होण्याआधीच ३३१ कोटी जप्त... - Assembly Elections  331 crore seized before polls begin | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

धक्कादायक : निवडणूक सुरू होण्याआधीच ३३१ कोटी जप्त...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजे १२७. ६४ कोटी रुपये, पश्चिम बंगालमधून ११२.५९ कोटी रुपये जप्त केले आहेत.

नवी दिल्ली : देशात पाच राज्य व एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कारवाई करीत विक्रमी ३३१ कोटी रुपये जप्त केले आहेत. प्रत्यक्ष निवडणुक सुरू होण्याआधीच ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजे १२७. ६४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगालमधून ११२.५९ कोटी रुपये जप्त केले. या दोन्ही राज्यांसह आसाम, केरळ व पुदुच्चेरीत काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने २९५ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे, पाच विशेष निरीक्षकही नेमले आहेत.

निवडणूक खर्च देखरेख प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या राज्यांमध्ये २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षाही ही रक्कम मोठी आहे.  निवडणूक खर्चाच्या अधिक प्रभावी देखरेखीसाठी यापूर्वीच्या
कामाचे निर्दोष रेकॉर्ड असलेले अधिकारी नियुक्त केले जातात. एकूण मतदारसंघांपैकी २५९ मतदारसंघ खर्चाच्या दृष्टिने संवेदनशील ठरविण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदारांना रोख रक्कम, भेटवस्तू
देण्यास कायद्यानुसार परवानगी नाही. मात्र, उमेदवारांकडून पैसे, मद्य किंवा इतर वस्तू मतदारांना दिल्या जातात. हे कृत्य लाचखोरीत गृहित धरले जाते. लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविला जातो.
 
पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 

पश्चिम बंगाल : जागा - 294, टप्पे - 8, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल, टप्पा 4 - मतदान - 10 एप्रिल, टप्पा 5 - मतदान - 17 एप्रिल, टप्पा 6 -
मतदान - 22 एप्रिल, टप्पा 7 - मतदान - 26 एप्रिल, टप्पा 8 - मतदान - 29 एप्रिल.

तमिळनाडू : जागा - 234, टप्पे - 1, मतदान - 6 एप्रिल.
केरळ : जागा - 140, टप्पे -1, मतदान - 6 एप्रिल.
आसाम : जागा - 126, टप्पे - 3, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल.
पुदुच्चेरी : जागा - 30, टप्पे - 1, मतदान - 6 एप्रिल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख