मोदी आज केरळ, तामिळनाडूमध्ये..तर गांधी आसामला..विधानसभेसाठी मोर्चेबांधणी - assembly election tamilnadu kerala pm Narendra modi visit arjun tank rahul gandhi assam bengal | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी आज केरळ, तामिळनाडूमध्ये..तर गांधी आसामला..विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

वृत्तसंस्था
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

मोदींच्या  कार्यक्रमांचे आयोजन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राजकीय पक्षांनी याठिकाणी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज केरळ आणि तामिळनाडू येथे दैारा आहे. मोदींच्या या कार्यक्रमांचे आयोजन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

तामिळनाडू आणि केरळच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. चेन्नई येथे मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. चेन्नई येथील मेट्रोचा विस्तार, रेल्वे मार्गाचे उद्घाटन, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, पेट्रोकेमिकल प्रकल्प, रोरो सेवा जहाजांचे लोकार्पण सोहळ्यास मोदी उपस्थित राहणार आहेत. चेन्नई येथे मोदींच्या हस्ते अत्याधुनिक अर्जुन रणगाडा लष्कराकडे सुपूर्द केला जाणार आहे. 

‘शाश्वत विकास शिखर परिषद 2021’ चे उद‌्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदीं करणार आहेत. केरळ आणि तामिळनाडूमध्ये एप्रिल- मेमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या केरळ दैाऱ्याआधीच याठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. तामिळनाडू आणि केरळ येथे काही गटांनी #GoBackModi और #PoMoneModi हे हँशटॅग टि्वटरवर ट्रेंड होत आहेत. 

दुसरीकडे केरळ येथे माकपा आणि एलडीएफ यांनी आपल्या निवडणुक प्रचार मोहीमेस प्रारंभ केला आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज आसाम मध्ये निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. शिवनगर बोर्डिंग फिल्ड येथे गांधी हे निवडणूक प्रचारास प्रारंभ करतील. काँग्रेसने याठिकाणी बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआईयूडीएफ) आणि अन्य पक्षांशी सोबत युती केली आहे. 

हेही वाचा : निवडणुका चालतात..फक्त शिवजयंतीवरच निर्बंध का..  
पिंपरी : सरकारला विधानपरिषद निवडणूक चालते... मेळावे चालतात. त्याला होणारी गर्दी चालते. ग्रामपंचायत निवडणुका चालतात, थेटर पूर्ण क्षमतेने भरलेली चालतात.. मग, शिवाजीमहाराजांची जयंतीच का चालत नाही ? तिच्यावरच का निर्बंध का अशी थेट विचारणा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख