मायावतींना मोठा धक्का; अखिलेश यादव बसपला खिंडार पाडण्याच्या तयारीत

उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे.
UP assembly election nine bsp MLAs meet Akhilesh yadav
UP assembly election nine bsp MLAs meet Akhilesh yadav

लखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांना पक्षात घेत भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. आता समाजवादी पक्ष बहूजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (UP assembly election nine bsp MLAs meet Akhilesh yadav)

उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी 325 जागा मिळत विरोधकांचा सुपडासाफ केला. सपा आणि काँग्रेस युतीची जादू या निवडणुकीत चालली नाही. मायावती (Mayavati) यांचाही करिष्मा चालला नाही. त्यामुळं त्यांना अनुक्रमे 54 व 19 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळं बसपचा उत्तर प्रदेशातील करिष्मा कमी झाल्याची चर्चा सुरू झाली.

आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीआधी बसपाला जोर का झटका बसण्याची शक्यता आहे. बसपच्या 19 पैकी 9 आमदारांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे आमदार बसपला सोडचिठ्ठी देऊन यादव यांचा पक्षात येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये असलम राईनी, असलम अली चौधरी, मुजतबा सिद्दीकी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांचा समावेश आहे.  

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. सर्वाधिक विधानसभा व लोकसभेच्या जागा या राज्यात आहेत. त्यामुळं भाजपसह सर्वच पक्षांचं या राज्याच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष्य असतं. भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. योगींनी नुकताच दिल्ली दौरा करून मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेला पुर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत त्यांनी पंतप्रधान मोदींसह अमित शहा व जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. पण मंत्रीमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. 

आगामी निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाऊ शकते. मात्र, भाजपकडून अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोना काळामध्ये उत्तर प्रदेशातील स्थिती हाताळण्यात योगींना अपयश आल्याचा ठपका काही आमदारांनी केला आहे. तशी नाराजी दिल्लीपर्यंत पोहचवण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशसह दिल्लीतही बैठका पार पडल्या. यामध्ये योगींना अभय दिल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com