अॅापरेशन कमळ? निकालाआधीच काँग्रेसच्या उमेदवारांची पळवापळवी

निवडणूक निकालानंतर आमदार फुटण्याची भिती वाटत असल्याने काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Assembly Election Congress brought 20 candidates from assam to jaipur
Assembly Election Congress brought 20 candidates from assam to jaipur

नवी दिल्ली : देशात पश्चिम बंगालसह तमिळनाडू, अासाम, केरळ व पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरू आहेत. मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आसामधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. तर 2 मे रोजी पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आहेत. 

भाजपकडून पाचही राज्यांमध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. यापैकी केवळ आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर सीएएच्या मुद्यामुळे काँग्रेसलाही या राज्यात सत्ता मिळण्याची आशा आहे. त्यामुळे तीन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर लगेचच काँग्रेसने जवळपास 20 उमेदवारांना जयपूरला पळविले आहे. त्यांना तिथे एका हॅाटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते.

आसाममध्ये विधासनभेच्या एकूण 126 जागा आहेत. काँग्रेस, यूडीएफ आणि डाव्या पक्षांनी एकत्रित येत ही निवडणूक लढविली. 2016 च्या निवडणुकीत यूडीएफ आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. परिणामी, मतविभागणीचा फटका दोन्ही पक्षांना बसला. तर भाजपचे उमेदवार अगदी कमी फरकाने विजयी झाले. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केल्याने विजयाची आशा वाढली आहे. पण काटावर विजय मिळाल्यास भाजपकडून अॅापरेशन कमळ राबविले जाण्याची भिती काँग्रेसला आहे.

निवडणूक निकालानंतर आमदार फुटण्याची भिती वाटत असल्याने काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे 20 हून अधिक उमेदवारांना आत्ताच जयपूरला आणण्यात आले आहे. त्यांना एका हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये यूडीएफ पक्षाचे उमेदवारही आहेत. गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये निवडणूकीनंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे आसामध्ये काँग्रेसकडून सावधगिरी बाळगली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

आसामध्ये भाजपने मुस्लिमबहुल भागातही जोर लावला होता. या भागात त्यांनी नऊ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. या भागात काँग्रेस व यूडीएफचे समर्थक अधिक आहेत. पण मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने जवळपास 12 जागांवर नुकसान झाले होते. यावेळी दोन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपसाठीही ही निवडणूक कठीण बनली आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com