Assam Assembly Elections : उद्या 'रिपाइं' फुंकणार रणशिंग..10 उमेदवार रिंगणात... - Assam Assembly Elections 10 Republican candidate Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

Assam Assembly Elections : उद्या 'रिपाइं' फुंकणार रणशिंग..10 उमेदवार रिंगणात...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 10 उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई : आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 10 उमेदवार  रिंगणात आहेत. उद्या (ता.31) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आसाममध्ये प्रचार दौरा करणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी दिली आहे. 

आसाम मधील पाथरकांडी विधानसभा मतदारसंघात रिपाइंचे जयंत सिन्हा; सिलचर मतदारसंघात प्रसंत लष्कर; बिळाशीपुरा पूर्व मतदारसंघात प्रदीप रॉय; सारभोगमध्ये प्रकाश ब्रह्मा ; भाबनिपुरमध्ये अनोवर उद्दीन अहमद; पटाचरकुची मध्ये कृष्णा मोनी दास ; बघबोर मतदारसंघात रेजऊल  करीम ; चेंगामध्ये नूरुल आलम; गुवाहाटी पूर्व मध्ये प्रणाब ज्योति दास ; गुवाहाटी पश्चिम मध्ये कल्याण शर्मा; हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उमेदवार आहेत.

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 10 उमेदवार स्वबळावर लढत आहेत. उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. आसाम मधील गुवाहाटीमध्ये उद्या (ता. 31) रामदास आठवले प्रचार दौरा करणार आहेत. आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढत आहेत, अशी माहिती विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. भाजपाल 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या. आसममध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सीएएचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख