'तृणमूल'च्या खासदार नुसरत जहाँ यांच्या आरोपानंतर पती निखिल जैन यांचा मोठा खुलासा..

निखिल यांनी आपल्या लग्नाचे सारे फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकले आहे.
3Sarkarnaa_20Banner_20_2824_29.jpg
3Sarkarnaa_20Banner_20_2824_29.jpg

नवी दिल्ली : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॅाग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मोडलेल्या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. नुसरत जहाँ Nusrat Jahan यांनी आपले लग्न अवैध असल्याचे दोन दिवसापूर्वी सांगितलं. यावर त्यांचे पती निखिल जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. asked nusrat jahan to register marriage but she avoided says nikhil jain

नुसरतने सांगितलं आहे की आमचं लग्न अवैध आहे तर आमचा घटस्फोट कशासाठी..असा सवाल निखिल जैन यांनी उपस्थित केला आहे. निखिल यांनी आपल्या लग्नाचे सारे फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकले आहे. नुसरत यांनी निखिल यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. निखिल यांनी त्यांच्या बॅक अकाउंटमधून बेकायदा पैसे काढल्याचा आरोप नुसरत यांनी निखिल यांच्यावर केला आहे. हा आरोप निखिल यांनी खोडून काढला आहे. निखिल यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

निखिल जैन म्हणाले की, नुसरत यांचे माझ्यावर प्रेम नव्हते, मी तिला प्रपोज केलं होते. तिनं माझा आनंदाने स्वीकार केला होता. आमच्या लग्नाच्या दिवसानंतर नुसरतच्या वागण्यात बदल झाला. त्यांनतर आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता, असा खुलासा नुसरत यांनी दोन दिवसापूर्वी केला. हा विवाह तुर्की कायद्यानुसार झाला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध असल्याचे देखील त्यांनी सांगितले.   

नुसरत जहाँ म्हणतात, आमचे लग्न तुर्की कायद्यानुसार झाले होते. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. भारतीय कायद्यानुसार ते लग्न नव्हते, ते फक्त एक नाते किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नसल्याचेही त्या म्हणाल्या. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो होतो. मात्र, मी त्यावर भाष्य टाळले होते. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नुसरत जहाँ यांनी आपल्या पैशांचा आपल्या परवानगीशिवाय वापर होत असल्याचा आरोप केला आहे. जे स्वत: श्रीमंत असल्याचा दावा करत आहेत, निखिल जैन त्यांनीच माझ्या बँकेतून अवैधरीत्या पैसे काढले आहेत. आम्ही वेगळे झाल्यानंतरही त्यांनी पैसे काढले असल्याचे नुसरत जहाँ  यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मी बँकेकडे तक्रार केली असून पोलिसात देखील लवकरच तक्रार केली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैन यांच्याशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत आणि निखिल मध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com