गोध्रामध्ये 'एमआयएम'ची एंट्री; भाजप, काँग्रेसला टक्कर देत सात जागांवर विजय

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतेक ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली आहे.
Asaduddin Owasis AIMIM won 7 seats in godhra municipalti election
Asaduddin Owasis AIMIM won 7 seats in godhra municipalti election

अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतेक ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पण आपसह खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमचे उमेदवार अनेक ठिकाणी विजयी झाले आहे. एमआयएमने गोध्रा नगरपालिकेत लढविलेल्या 8 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे.

गोध्रामध्ये 2002 मध्ये मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली होती. त्यामुळे येथील निवडणुकांना महत्वपूर्ण मानले जाते. या दंगलीनंतर अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आले आहेत. पण यावेळी ज्या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते तिथे ओवेसी यांच्या पक्षाने बाजी मारल्याचे चित्र आहे.

गोध्रा नगरपालिकेत एकुण 44 जागा असून एमआयएमने 8 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर विजय मिळाला आहे. ओवेसी यांनी स्वत: गोध्रामध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. गोध्रा प्रमाणेच भरूच नगरपालिकेतही त्यांचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर मोडासा नगरपालिकेत एमआयएम विरोधी पक्ष बनला आहे. याठिकाणी 12 उमेदवारांपैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. 

गुजरातमधील महापालिका निवडणुकीतही ओवेसी यांच्या उमेदवारांनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून भाजपसह काँग्रेसलाही जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुजरातमध्ये पहिल्यांदाच भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) सोबत आघाडी करत ओवेसी यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. हे दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीतही एकत्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लीम, दलित, आदिवासी मतांवरच त्यांचा अधिक जोर राहू शकतो. याचा थेट फटका काँग्रेसला बसेल, अशी चर्चा आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com