उत्तरप्रदेशात 'एआयएमआयएम' 100 जागा लढणार ; 'बसप युतीची चर्चा खोटी'

आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही.
Sarkarnama Banner - 2021-06-28T094704.520.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-28T094704.520.jpg

लखनौ : बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांची चांगली दमछाक करणाऱ्या आँल इंडिया मजजिल-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन(एआयएमआयएम) आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत एआयएमआयएम शंभर जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. asaduddin owaisi party will fight on 100 seats in the uttar pradesh assembly elections

उत्तर प्रदेशात ओवैसी बहुजन समाज पक्षासोबत युती करणार असल्याची चर्चा होती, यानंतर ओवैसींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही."

 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करणार असल्याचे म्हटलं होते. या बातम्याचे खंडना ओवैसींनी केलं आहे. त्यांनी टि्वट करीत आपली भूमिका मांडत या चर्चा खोट्या असल्याचे म्हटलं आहे.  
 
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "मला उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.   

एका दुसऱ्या टि्वटमध्ये ते म्हणतात की, "आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही." बिहारमध्ये एआयएमआयएमने २० जागा लढविल्या होत्या. यातील पाच जागांवर त्यांना विजय मिळाला होता. 

मुंबई  : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यात लोकल सेवा बंद असल्याने सामान्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका युवकाचा व्हिडिओ शेअर करीत सरकारला टोला लगावला आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com