अभिनेते अनुपम खेर यांचा "युटर्न"..मोदींविषयी म्हणाले...

अनुपम खेरत्यांच्या विधानाची सारवासारव करताना दिसत आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-14T155349.071.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-14T155349.071.jpg

मुंबई :   कोरोनाचा रोखण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी  ठरत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे Narendra Modi प्रशंसक ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर  Anupam Kherयांनी काल प्रथमच मोदींवर हल्लाबोल केला. या घटनेला काही तास होताच त्यांनी युटर्न घेतला आहे. anupam kher tweeted new lines after criticized central government

मोदींनी सध्याच्या काळात स्वतःची 'इमेज' बनविण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहे, अशी टीका खेर यांनी काल केली होती. अनुपम खेर यांनी आज म्हटले आहे की, ‘काम करणार्‍यांकडून चुका होत असतात, बिनकामी लोकांचे आयुष्य इतरांच्या चुका शोधण्यात निघून जाते.’ या टि्वटमुळे अनुपम खेर काल केलेल्या त्यांच्या विधानाची सारवासारव करताना दिसत आहेत.  “चूका केवळ काम करणार्‍या लोकांकडून होतात, बिनकामी लोकांचे जीवन केवळ दुसर्‍याच्या वाईट गोष्टी शोधण्यातच संपते.” हे ट्वीट अनुपम खेर यांच्या मागील विधानाशी जोडले जात आहे. 

काही दिवसापूर्वी अनुपम खेर यांनी "आयगा तो मोदीही" अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अनुपम खेर हे मोदींचे प्रशंसक म्हणून ओळखले जातात, त्यांनी प्रथमच कील उघडपणे मोदी सरकारवर टीका केल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनुपम खेर यांच्या पत्नी अभिनेत्री किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. एका खासगी वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत खेर यांनी मोदींवर निशाणा साधला होता.  

“सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी सरकारने काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,” असे अनुपम खेर मुलाखतीत म्हणाले होते.  
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com