ममतादीदींना आणखी एक झटका; वनमंत्र्यांचा राजीनामा

वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. बॅनर्जी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
Another blow to Mamata Banerjee forest minister resigns
Another blow to Mamata Banerjee forest minister resigns

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. त्यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याने शुक्रवारी राजीनामा दिल्याने मोठा धक्का बसला आहे. वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी मंत्रीपद सोडले असून राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. बॅनर्जी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. पण त्याआधीच तेथील राजकीय वातावरण चांगले तापले असून ममतादीदींचे शिलेदार भाजपच्या गळाला लागत आहेत. बॅनर्जी हे काही दिवसांपासून नाराज होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांनी शुक्रवारी थेट राज्यपालांकडे मंत्रीपदाचा राजीनामा पाठविला. 

राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानतो, असे त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटले आहे. बॅनर्जी हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राजीव बॅनर्जी व तृणमुल काँग्रेसचे काही नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. 

तृणमुलमधील गळती सुरूच...

दरम्यान, भाजपने तृणमुलमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. मोठा जनाधार असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपुर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दोन दिवसांपुर्वीच शांतीपूरमधील आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजमध्ये प्रवेश केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर ममतादीदींना सतत धक्के बसत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. आणखी काही नेते भाजपमध्ये येणार असल्याचे अधिकारी यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. ही गळती रोखण्यासाठी ममता सरकारमधील मंत्री प्रयत्न करत असले तरी त्यांना यश येताना दिसत नाही.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com