कॉंग्रेसला आणखी एक धक्का; महासचिवाचा पक्षाला रामराम 

आधीच कमजोर असलेल्या तामिळनाडू कॉंग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे.
कॉंग्रेसला आणखी एक धक्का; महासचिवाचा पक्षाला रामराम 
Another blow to Congress; Goodbye to the General Secretary's party

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून तशी नेतेमंडळींच्या कोलांटउड्यांनाही प्रारंभ झाला आहे. आधीच कमजोर असलेल्या तामिळनाडू कॉंग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे.

पक्षाच्या महासचिवपदाची धुरा सोपविण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर अप्सरा रेडी यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रेडी यांनी पुन्हा एकदा आपल्या आधीच्या पक्षात म्हणजे अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश केला आहे. 

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत अपयश पदरी पडलेल्या कॉंग्रेस पक्षामागचे शुक्‍लकाष्ट काही केल्या संपायला तयार नाही.

देशभरातील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात निष्ठावंतांमध्ये गणना होत असलेल्या कपिल सिब्बल सारख्या नेत्याकडून पक्षाच्या हायकमांडला वारंवार कानपिचक्‍या दिल्या जात आहेत, त्यातच आता तमिळनाडूमध्ये पक्षाला धक्का बसला आहे. 

अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा अप्सरा यांनी ट्विटरवर केली आहे. ट्‌विटमध्ये त्यांनी म्हटलं की, मी पुन्हा एकदा अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाच्या एका कार्यक्रमात मी अण्णा द्रुमकमध्ये प्रवेश केला आहे. आता अम्मा (जयललिता) यांच्या पक्षाचे सरकार तामिळनाडूमध्ये तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणार आहे. 

अप्सरा रेड्डी यांना अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी राजकारणात आणलं होतं. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी शशिकला यांच्या गोटात प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांनी ओपीएस-ईपीएस यांच्या गटात जाणे पसंत केले होते. 

दरम्यान, अप्सरा रेड्डी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेस प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर महिला कॉंग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र अप्सरा यांनी आता पुन्हा एकदा अण्णा द्रमुकची वाट धरली आहे. 

अप्सरा यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असून मोनाश युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेची पदवी घेतली आहे. याशिवाय ब्रॉडकास्टिंग पत्रकारितेमध्ये सिटी युनिव्हर्सिटी, लंडनची पदवी घेतली आहे. रेड्डी या बराच काळ पत्रकारितेत होत्या. त्यांनी अनेक नामांकित संस्थांमध्ये काम केलं आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in