भारतात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट; या नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्यता!    

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.
 Alert of terrorist attack in India .jpg
Alert of terrorist attack in India .jpg

मुंबई : देशात गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी (terrorists) हल्ल्याचा अलर्ट दिला आहे. ज्यूंचा हॉलिडे 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने इस्रायलचे (Israel) नागरिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे. (Alert of terrorist attack in India) 

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील ज्यू हॉलीडे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. अफगानिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीनंतर गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यानंतर एकापाठोपाठ अनेक अलर्ट त्यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

दहशतवादी 6 सप्टेंबरच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा ज्यूंना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे सुरक्षा एजन्सी अधिक सतर्क झाल्या आहेत. इस्रायल दूतावास, वाणिज्य दूतावास आणि त्यांचे कर्मचारी, कोशेर रेस्टॉरंट हॉटेल, चाबड हाऊस, ज्यू कम्युनिटी सेंटर, इस्त्रायल पर्यटन स्थळे,  अशा ठिकाणांना अधिक सुरक्षा पुरण्यात येणार आहे. या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, काही दिवसा पुर्वीही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रीय असलेल्या 'इसिस खुरासान'कडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने हा खुलासा झाला आहे. अफगाणिस्तानात तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर भारताच्या उत्तरेकडील बाजूस दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना इसिसचे प्रशिक्षित घुसखोर-दहशतवादी भारताला हादरा देण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर भारतातील मंदिरे, काही राजकीय नेते आणि गर्दीची ठिकाणे असल्याचेही सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com