आता 'ही' विमानेही उतरणार महाराष्ट्रात...

महाराष्ट्रात किंवा मुंबईत विमान उतरविण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
2Pune_Off_duty_pilot_lands
2Pune_Off_duty_pilot_lands

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे रशिया, युक्रेन, किर्गिस्तान, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, दुबई, संयुक्त अरब अमिरती आदी देशामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व नोकरदार अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचे आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे की मुंबईत विमान उतरत नाही. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात किंवा मुंबईत विमान उतरविण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून परदेशातील विमाने उतरविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक ते सहकार्य करीत आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. जयशंकर यांच्याशी संपर्क साधत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या बाबत राज्य सरकारच्या सहकार्याची भूमिका असेल असे सांगितले.  

परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी नोकरदारांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे प्रयत्न करेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत ठाकरे यांनीही ऑपरेशन वंदेमातरमतंर्गत 7 जूनपासून सुरू होणाऱया तिसरय़ा टप्प्यासाठी महाराष्ट्रात येणाऱया विमानांसाठी सहकार्य करण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगितले आहे.  

सुळे म्हणाल्या, "श्रीलंका, अमेरिका, इंग्लंड, अफगनिस्तान आदी देशांतील विमाने मुंबई, पुण्यात या पूर्वीही उतरली आहेत. सध्या परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी, नियोजनही महाराष्ट्र सरकार करीत आहे. सद्यस्थितीत त्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या गावी पोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्ऩशील आहे."  

मदत करण्याची विनंती 

लॅाकडाउनमुळे अनेक देशांतील कंपन्या, शिक्षण संस्था, कारखाने बंद आहेत. तेथील अनेक भारतीय विद्यार्थ्यांकडील पैसे संपत आले आहेत, काहीजणांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहे. मुंबईत विमान उतरविले जात नाही, असा गैरसमज तेथील काही दूतावासांतही पसरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र सरकार यांच्याशी ट्विटरवरून संपर्क साधला. त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. 

हेही वाचा :  पुण्याहून चार विमानांचे टेक अॅाफ...  

पुणे  : निसर्ग वादळामुळे लोहगाव विमानतळावरील विमानसेवा बुधवारी विस्कळीत झाली होती. आज पुण्यात सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने विमानसेवा सुरळीत झाली.  गुरुवारी पहाटेपासून पाऊस कमी झाल्याने विमानसेवा सुरळीत झाली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंतची विमानांची चार उड्ड़ाणे सुरळीत पार पडली. पाऊस आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे पुण्याकडे येणारी सहा उड्डाणे अन्यत्र वळविण्यात आली होती. गुरुवारी पहाटेपासून सकाळपर्यंतची विमानसेवा सुरळीत असल्याची माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com