एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र... 

एअर इंडियाला दिलेल्या विशेष आर्थिक पॅकेजमुळे फक्त एअर इंडियालाच मदत होणार नाही तर त्याचा लाभ सर्व विमानसेवा क्षेत्राला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे.
air india
air india

मुंबई : एअर इंडियाने राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे, देशाला एअर इंडियाची गरज आहे, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून चांगली कामगिरी केली आहे, या पार्श्वभूमीवर 
केंद्र सरकारकडे एअर इंडिया कर्मचारी संघटना आणि स्टाफ संघटनांनी संयुक्तपणे 50 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. याबाबत या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
 
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या संघटनांनी म्हटले आहे की एअर इंडियाला दिलेल्या विशेष आर्थिक पॅकेजमुळे फक्त एअर इंडियालाच मदत होणार नाही तर त्याचा लाभ सर्व विमानसेवा क्षेत्राला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे.  सध्याच्या परिस्थितीत विमानसेवा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, यावर आपणही सहमत व्हाल. म्हणूनच देशातील विमानसेवा क्षेत्राला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे आणि या क्षेत्राचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत करणे गरजेचे आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य  देण्यासाठी  
50 हजार कोटी रुपयांची मदत हवी आहे. यामुळे पुढील दीर्घकालात एअर इंडिया भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात सक्षम विमानसेवा कंपनी म्हणून उदयास येईल,' असे पंतप्रधानांना एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती, यांचे या संघटनांनी आभार मानले आहे. सरकारने विविध क्षेत्रांना याआधी केलेल्या मदतीचा आणि रिझर्व्ह बॅंकेने उचललेल्या पावलांचाही समावेश होता. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. आघाडीच्या अनेक पतमानांकन संस्थांनी कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात चालू आर्थिक वर्षात 5 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

'तुम्ही अर्थव्यवस्थेला आणि उद्योग-धंद्यांना चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजसाठी आम्ही आपल्याला धन्यवाद देतो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. भारत, चीनसहीत अनेक देशांमध्ये वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची वाहतूक एअर इंडियाने केली आहे. एअर इंडियाने राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संकट काळात देशासाठी एअर इंडियाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे, असेही या पत्रात पुढे म्हटले आहे.

ही पण बातमी वाचा : लोहगाव विमानतळावरून 'टेक ऑफ

पुणे : देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा तिढा मिटल्यामुळे लोहगाव विमानतळावरून वाहतूक सुरू झाली. दिल्ली, चेन्नई, कोचीन, हैदराबाद, कोलकत्ता, बंगळूरू, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, नाशिक या शहरांसाठी विमानतळ प्रशासनाने विमान वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. विमानतळावरून येण्यासाठी आणि जाण्यासाठी सध्या कॅब सेवा उपलब्ध नाही. त्या मुळे प्रवाशांनी आपापल्या वाहनांनी विमानतळावर यावे अथवा जावे. ज्या प्रवाशांकडे वाहनांची व्यवस्था नाही, त्यांनी 9859198591 या क्रमांकावर संपर्क साधून रिक्षाची व्यवस्था करावी, असे ट्विट विमानतळ प्रशासनाने केले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com