एआयडीएमकेची गेम? भाजपने टाकला शशिकलांचा हुकमी पत्ता...

शशिकला यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते.
AIDMK weighs BJP push for Sasikala in upcoming elections
AIDMK weighs BJP push for Sasikala in upcoming elections

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते. शशिकला यांचा फटका आगामी निवडणूकीत बसू शकतो, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे 'एआयडीएमके'वर दबाव वाढला आहे. पण मुख्यमंत्री पलानीस्वामी त्यावर नाखूष असल्याचे समजते. शशिकला पुन्हा पक्षात परतल्यास हातातून पद जाण्याची भीती त्यांना असल्याचे दावा केला जात आहे.

शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांनी न्यायालयात धाव घेत पक्षाने त्यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या. पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एआयडीएमकेशी हातमिळवणी केली आहे. या आघाडीत भाजपला जेमतेम 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. पण शशिकला फॅक्टरची भीती या आघाडीला असल्याचे दिसते. एआयडीएमकेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पण शशिकला यांच्या पक्षातील पुर्नप्रवेशावरही यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

शशिकला पक्षात परतल्यास त्यांचा आघाडीला फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे. पनीरसेल्वम याला सहमत असले तरी पलानीस्वामी यांचा नकार दिसतो. त्यांना परत घेतल्यास पक्षावर ताबा मिळवतील. पक्षातील नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे मंत्र्याने सांगितले. पक्षातील जवळपास निम्या नेत्यांना शशिकला यांना पुन्हा पक्षात घेण्यास सहमती असु शकते. त्यांच्यामुळे पक्ष बळकट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

शशिकलांबद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी अण्णाद्रमुकने अचानक मवाळ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्यासाठी आधी शशिकला गॉडफादर ठरल्या होत्या. राज्याच्या राजकारणात त्या दोघांना पुढे आणण्याचे श्रेय शशिकलांना जाते. आता अण्णाद्रमुकच्या नेत्यांना थेटपणे शशिकलांवर टीका करणे अचानक बंद केले आहे. यामागे कारण आहे शशिकलांना पक्षातील वाढता पाठिंबा. त्यांच्या चर्चा न करता अनुल्लेखाने मारण्याची खेळी खेळण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com