मतांसाठी कायपण! उमेदवाराने धुतली मतदारांची कपडे अन् बनवले डोसे...

उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत.
AIADMK candidate Thanga Kathiravan from Nagapattinam washed clothes
AIADMK candidate Thanga Kathiravan from Nagapattinam washed clothes

चेन्नई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासने दिली जात आहेत. अशाच एका उमेदवाराने तर चक्क मतदारांची कपडे धुतली. तसेच निवडणूक जिंकल्यास वॉशिंग मशिन देण्याचे आश्वासनही देऊन टाकले.

तमिळनाडूमध्ये २३४ मतदारसंघांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अण्णाद्रमुक व द्रमुख या दोन पक्षांमध्ये प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते व उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी येथील सर्वच पक्ष अशा घोषणा करून मतदारांना भूरळ पाडण्याचा प्रयत्न करतात. 

प्रचारादरम्यानही याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अण्णाद्रमुकचे नागपट्टिनम मतदारसंघातील उमेदवार थांगा कातिरवन हेही जोरदार प्रचार करत आहेत. प्रचार करताना त्यांनी थेट एका मतदाराचे कपडे धुवण्यासाठी बैठक मारली. काही कपडे धुतल्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकल्यास वॉशिंग मशिन देण्याचे आश्वासनही देऊन टाकले. कातिरवन यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते व नागरिकांनाही यावेळी धक्का बसला. पण त्यांच्या या कृतीचे कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागतही केले. कातिरवन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर उमेदवारांच्या प्रचारालाही आता वेग आला आहे. डीएमकेचे उमेदवार प्रभाकर राजा यांनी एका डोसा विक्रेत्याकडे डोसा बनवून ग्राहकांना दिला. आपल्याला मतदान केल्यास आणखी डोसे खायला घालू, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

इंडिया मक्कल मुनेत्र काची या पक्षाचे रोबोट हे निवडणूक चिन्ह आहे. पक्षाकडून प्रचारात रोबोटचा वापर केला जात आहे. तसेच काही उमेदवारांनी डोक्यावरच पक्षाचे चिन्ह तयार करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते कमल हसन यांनी रिक्षातून प्रचार करून मतदारांना साकडे घातले होते.  तमिळनाडू अशाप्रकारे मतदारांना अनेक आश्वासन दिली जात आहे. आता मतदार या आश्वासनांना किती भुलतात, हे २ मे रोजी निकालातूनच स्पष्ट होईल. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com