मुंबई बत्ती गुलचा फटका अमिताभ बच्चन यांनाही...म्हणाले 'शांत रहा..संयम पाळा..' 

मी आपल्याशी डोंगलच्या माध्यमातून संपर्क साधत आहे. सर्वाना माझी विनंती आहे की शांत रहा..संयम पाळा.
collage (51).jpg
collage (51).jpg

मुंबई : मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला असून मुंबईत सकाळपासून वीज गेली आहे. रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, अलिबागलाही याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईच्या बत्ती गुलचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसला.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की मी आपल्याशी डोंगलच्या माध्यमातून संपर्क साधत आहे. सर्वाना माझी विनंती आहे की शांत रहा..संयम पाळा. मुंबईची वीज खंडीत झाल्याने मी पाठवित असलेली पोस्ट समजून घ्या. सर्वांनी शांत राहावे. वीज खंडीत झाल्याने मुंबई परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या टि्वटवर सेलिब्रेटी आणि त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बी यांच्या या टि्वटवर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक आपल्या टि्वटमध्ये म्हणतो "सर्व जण इतके हैरान का आहेत. हे 2020 आहे काहीही होऊ शकते." अभिषेकच्या या टि्वटवरही अनेकांना कमेंट केल्या आहेत. त्याचे हे टि्वट अनेकांना शेअर केलं आहे. 

मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला असून  मुंबईत सकाळपासून वीज गेली आहे. रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, अलिबागलाही याचा मोठा फटका बसला आहे. 
 
ग्रीड फेल्युअरचा परिणाम म्हणून कळवा-पडघा आणि खारघर येथील ट्रान्सफाॅर्मर बंद पडले. त्यामुळे मुंबई व उपनगरांना होणारा वीज पुरवठा बंद झाला. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेच्या कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची उपनगरी सेवाही बंद झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले, ''देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नीट नियोजन केले जात असल्याने ग्रीड फेल्युअरचा हा प्रकार घडला आहे. त्यातच शंभर युनिट, तीनशे युनिट वीज मोफत देण्याबाबत ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. हो लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहणार नाहीत,''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com