मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती - After Modi, the people prefer Yogi for the post of PM | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

सर्वेक्षणात ५० टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ मोदींनंतर पंतप्रधान व्हावेत असे सांगितले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान असावेत, हा प्रश्न अनेकवेळा चर्चेला येतो. उत्तरप्रदेशात केलल्या पाहणीत या प्रश्नाचं उत्तर जनतेने दिले आहे. मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी व्होटर आणि एका वृत्तवाहिनीने केलेल्या पाहणीत पंतप्रधानपदासाठी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात ५० टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ मोदींनंतर पंतप्रधान व्हावेत असे सांगितले आहे. 

३७ टक्के लोकांनी त्याला विरोध करत योगी सक्षम नसल्याचे म्हटले आहे. तर १३ टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगता येणार नाही असे म्हटले आहे. २०१७ पेक्षाही मोठ्या बहुमताने ते निवडून येणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सध्या निवडणुका झाल्यास भाजपाला ४१ टक्के, समाजवादी पक्षाला २४ टक्के, बसपाला २१ टक्के मते मिळतील, असे सर्वेक्षणात आढळले आहे.

हेही वाचा : #Rippedjeans : प्रियांका गांधीचा 'त्या' फोटोंवरून मोहन भागवत, गडकरींवर निशाणा
 
नवी दिल्ली : फाटलेली जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार करणार? असे आक्षेपार्ह वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी केले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो महिलांनी या वक्तव्याचा समाचार घेत फाटलेल्या जीन्समधील फोटो शेअर केले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या वादा उडी घेतली आहे. रावत यांच्या वक्तव्यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या तिघांचे हाफ पॅन्टमधील जुने फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 'हे भगवान, त्यांचे गुडघे दिसत आहेत', असे त्या फोटोंच्या वर लिहिण्यात आले आहे. प्रियांका गांधींच्या या ट्विटला ५५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर १५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी हे ट्विट शेअर केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख