नुसरत जहा म्हणाल्या, "ममतादीदींसाठीही एक तासापेक्षा जास्त प्रचार करूच शकत नाही....

भाजपने टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये नुसरत जहा गाडीतून उतरताना दिसत आहेत.
Nusrat Jaha29.jpg
Nusrat Jaha29.jpg

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेसकडून खासदार झालेल्या नुसरत जहा या स्टार प्रचारक आहेत. भाजपाकडून ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्यासह अनेक तारे-तारका प्रचारात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पश्चिम बंगाल एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. नुसरत जहा यांचा २६ सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यामध्ये प्रचार रॅलीतून त्या मध्येच उतरल्या आहेत. पुन्हा प्रचारासाठी येण्यास नकार देताना दिसत आहेत.

भाजपने टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये नुसरत जहा गाडीतून उतरताना दिसत आहेत. रँलीतील कार्यकर्ते त्यांना पुन्हा रोडशोमध्ये सहभागी होण्याची विनंती करीत आहेत. परंतु, नुसरत जहा म्हणतात, "मी एक तासापेक्षा जास्त हे करू शकत नाही. अगदी मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी नाही." कार्यकर्ते त्यांना विनंती करत आहेत की किमान सभेच्या मुख्य ठिकाणापर्यंत तरी चला. खासदार नुसरत जहा तासाभराच्या प्रचाररॅलीतच दमल्या आणि कार्यकर्त्यांनी मुख्य मैदानापर्यंत चलण्याचा आग्रह केला तरी त्यांनी मान्य केले नाही. 

संसदेत तिहेरी तलाक, सीएए यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा असताना त्या हनीमूनसाठी मॉरीशसला गेल्या होत्या. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त आल्यावर त्यांनी हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे चांगलीच टीका झाली होती.

नुसरत जहा  २०१९ मध्ये बशीरहाट मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. सोशल मीडियामध्ये त्या प्रचंड सक्रीय असतात. परंतु, अनेकदा त्यावरून वाद ओढवून घेतात. बंगालमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून खासदार नुसरत जहा या ओळखल्या जातात.
 
हेही वाचा : केजरीवाल यांना झटका; केंद्राच्या दिल्ली विधेयकाचे कायद्यात रुपांतर 
 
नवी दिल्ली : दिल्लीत नायब राज्यपालांचे अधिकार वाढवण्याशी संबंधित विधेयकावरुन आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष समोरा-समोर आले होते. त्यानंतरही राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (सुधारणा) विधेयक २०२१ लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते. त्यानंतर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली, असून आता याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका मानला जात आहे. 
 
 
   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com