अभिनेत्री विजयशांती लवकरच भाजपत प्रवेश करणार : सुनील देवधरांच्या प्रयत्नांना यश 

टॉलीवूडच्या आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीमुळे भाजप नेतृत्वाच्या महत्वाकांक्षी "दक्षिणायना'ला बळ मिळू शकेल, असे राजकीय वर्तुळातून मानले जात आहे.
Actress Vijay Shanti to join BJP: Success to Sunil Deodhar's efforts
Actress Vijay Shanti to join BJP: Success to Sunil Deodhar's efforts

नवी दिल्ली : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, माजी खासदार विजयशांती कॉंग्रेसला रामराम करून लवकरच भाजपमध्ये घरवापसी करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. विजयशांती यांना गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले, तर खुशबू यांच्यानंतर टॉलीवूडच्या आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीमुळे भाजप नेतृत्वाच्या महत्वाकांक्षी "दक्षिणायना'ला बळ मिळू शकेल, असे राजकीय वर्तुळातून मानले जात आहे. 

तेलंगण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. अरुण यांनीही विजयशांती भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते भाजप सुनील देवधर यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात येते. 

विजयशांती यांनीही आपला राजकीय प्रवास भारतीय जनता पक्षामधूनच सुरू केला होता. नंतर त्यांनी तेलंगण राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश केला. त्यानंतर तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या वेळी 2014 मध्ये त्या कॉंग्रेस पक्षामध्ये दाखल झाल्या होत्या. 

सध्या ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या येत्या एक डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्या व्यग्र आहेत. मात्र, कॉंग्रेसमध्ये त्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. कॉंग्रेस पक्षामध्ये आपल्याला योग्य ती वागणूक मिळत नसल्याची त्यांची भावना आहे. दिल्लीतील पक्षनेतृत्वाकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न करून आपली दाद-फिर्याद घेतली गेली नसल्याची त्यांची तक्रार आहे. 

सध्या त्या भाजप नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. लवकरच त्या दिल्लीला रवाना होऊ शकतात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या उपस्थितीत त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले जाईल, अशी माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com