NCB च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.. एजाझ खान पॉझिटिव्ह - Actor Ajaz khan found coronavirus positive | Politics Marathi News - Sarkarnama

NCB च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.. एजाझ खान पॉझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

काही दिवसांपासून एजाझ खानच्या संपर्कात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.

मुंबई : ड्रग्ज माफिया शादाब बटाटाला NCB ने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी बिग बॉस फेम बॉलिवूड अभिनेता एजाझ खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुधवारी अटक केली.  एजाझ खान (Ajaz khan)ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.  काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.

एजाझ खानचा काल रात्री कोरोनाचा अहवाल  आला आहे. बुधवारपासून एनसीबीचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत आहेत. एजाझचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने एनसीबीच्या अधिकारी चिंता वाढली आहे. राजस्थानहून मुंबईत पोहोचताच एअरपोर्टवर एजाझला  NCB ने ताब्यात घेतलं होतं.

एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही  एजाझला अटक झाली होती. जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये एजाझ खानने  काम केलं आहे. काही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. परंतु तो बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे चर्चेत आला. 
 
एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. शादाब बटाटा हा फारुख बटाटा यांचा मुलगा असून फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे. एनसीबीने शादाबला मिरारोड येथून तर शाहरुखला वर्सोवा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी शादाबच्या घरी 1.60 ग्रॅम MD, 61 मेफेड्रोनही जप्त करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख