कंगनाचं चित्रीकरण झालेल्या विमान कंपनीवर कारवाईचा बडगा..?

विमान प्रवासादरम्यान कंगना राणावतची अदा टिपण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी चित्रीकरणासाठी गोंधळ घातला. याप्रकरणी डीजीसीएनंविमान कंपनीकडून स्पष्टीकरणं मागविले आहे.
collage (21).jpg
collage (21).jpg

नवी दिल्ली : चंडीगड-मुंबई या विमान प्रवासादरम्यान अभिनेत्री कंगना राणावतची अदा टिपण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी चित्रीकरणासाठी गोंधळ घातला. याप्रकरणी मुलकी विमान वाहतूक नियमन महानिर्देशालयाने (डीजीसीए) विमान कंपनीकडून स्पष्टीकरणं मागविले आहे.

विमानात चित्रीकरण करू दिले तर संबंधित विमान कंपनीला आता ते महागात जाणार आहे. विमान प्रवास नियमावलीनुसार संबंधित कंपनीच्या विमान उड्डाणांवर पुढचे दोन आठवडे बंदी घातली जाईल, असा कडक इशारा मुलकी विमान वाहतूक नियमन महानिर्देशालयाने (डीजीसीए) दिला आहे. 

अभिनेत्री कंगना राणावतच्या अलीकडच्या चंडीगड-मुंबई या विमान प्रवासादरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन होते. त्यांनी विमानात घातलेला गोंधळ व कोरोना काळातील सामाजिक अंतरभानाच्या नियमाचे तीनतेरा वाजविल्याच्या पार्श्‍वभूमीवर विमान वाहतूक मंत्रालयाने हा बडगा उगारला आहे

कंगना राणावत ता. 9 सप्टेंबरला ज्या इंडिगो कंपनीच्या विमानातून मुंबईला आली, त्यावेळी तिची एकेक अदा टिपण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामन विमानतळांवर उपस्थित होते. ती ज्या विमानातून गेली त्यातही सर्रास चित्रीकरण सुरू होते. यावेळी कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन झाले होते. त्यानंतर डीजीसीएने इंडिगोकडून याबाबतचे स्पष्टीकरण मागविले होते. 

या कंपनीला पुढच्या आठवडाभरात या प्रकाराचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितलं आहे. मुळात हवाई प्रवास नियमावलीतील नियम क्र. 1937 (13) नुसार प्रवासी विमानात विना परवानगी कोणतेही चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. अशा घटनांत सामान्यतः संबंधित प्रवाशांवर कारवाई होते. मात्र, आता मंत्रालयाने असे प्रकार न रोखल्यास संबंधित विमान कंपनीलाच चाप लावण्याचे ठरविले आहे.

विमानात चित्रीकरण करू दिले तर त्या विमान कंपनीलाच पुढचे दोन आठवडे निलंबित केले जाणार आहे. कोरोना लॉकडाउननंतर अनलॉक मालिका सुरू होण्याच्या काळात डीजीसीएने 25 मे रोजी देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी दिली त्याच वेळी कोरोना महामारीच्या काळात पालन करायचे नियमही प्रसिध्द केले होते. त्यात विमानात चढताना किंवा उतरताना प्रवाशांची गर्दी होऊ नये, याची जबाबदारी संबंधित विमान कंपनीवर आहे.

रिया चक्रवर्तीचा कारागृहातील मुक्काम वाढला...
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या आरोपावरून अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा जामीन अर्ज न्यायालयानं  फेटाळला. त्यामुळे तिचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केली होती. रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. मंगळवारी न्यायालयाने रियाची जामिनाची मागणी फेटाळून तिला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी दिली होती. जामीन न मिळाल्यानंतर सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की एनडीपीएसच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने जाण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com