माजी विरोधी पक्षनेत्याचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष विलीन केला.
AAPs punjab ally merges with congress
AAPs punjab ally merges with congress

नवी दिल्ली : अनेक नेते काँग्रेसला (Congress) सोडून जात असताना पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amrinder singh) आणि माजी मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांच्या जोरदार वाद सुरू आहे. याचदरम्यान पंजाब विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेत्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. सिद्धूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच हे विलीनीकरण घडवून आणल्याचे बोलले जात आहे. (AAPs punjab ally merges with congress)

आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पंजाब एकता पार्टी हा पक्ष विलीन केला. ते पंजाब विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते आहेत. आपमध्ये असताना त्यांना हे पद मिळाले होते. आपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी या पक्षाची स्थापना केली होती. खैरा यांच्यासह आपचे आमदार जगदेव सिंग कमालू आणि पिरामल सिंग खालसा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावत व पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला उपस्थित होते. 

केजरीवाल म्हणजे 'वन मॅन शो'

आम आदमी पक्ष म्हणजे 'वन मॅन शो' आहे.  2015 मध्ये काँग्रेसला सोडून आपमध्ये केलेला प्रवेश चूक होती, असे खैरा म्हणाले. आपमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यापलीकडे कुणीच नाही. काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने घरवापसी केली आहे. आपमध्ये अंतर्गत लोकशाही अस्तित्वात नाही. विरोधी पक्षनेता असताना बेकायदेशीपणे हटवले. केजरीवाल यांना स्वयंगोल करण्याची सवय आहे, अशी टीका खैरा यांनी केली. 

दरम्यान, पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवजोत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नसल्याची भूमिका सिद्धू यांनी घेतली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्यूत्तर देत हे सिद्ध करण्याचे खूले आवाहन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर इतर नेते व मंत्रीही नाराज आहेत. सिद्धू यांच्यासह नाराज मंत्री, आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नुकतेच दिल्लीत बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनीही आपली बाजू पक्ष नेतृत्वासमोर मांडली आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघू शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com