गुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा.. - aam aadmi party to contest on all seats in gujarat legislative assembly polls arvind-kejriwal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

गुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

गुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. 

अहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने आता आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची रणनीती बनविली आहे. आम आदमी पार्टी २०२२ ची गुजरात विधानसभा निवडणूक लढविणार आहे. विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाचे Aam Aadmi Party प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप आणि कॅाग्रेसमुळे सध्या गुजरातची अवस्था वाईट झालेली आहे. गेल्या २७ वर्षापासून गुजरातमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. गुजरातमधील व्यापारी हे भयभयीत झाले आहेत. "काँग्रेस आमच्या खिशात आहे," असे भाजपचे मत आहे.  शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था खराब आहे. गुजरातमध्ये वीज इतकी महाग का आहे, यांचे उत्तर सरकारने दिलं पाहिजे. 

अरविंद केजरीवाल यांनी आज गुजरातसाठी एका नव्या मॅाडेलचे आश्वासन दिले. अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्ली माँडेल वेगळं आहे गुजरात माँडेल वेगळं असणार आहे. आम आदमी पक्ष गुजरातमध्ये स्थानिक मुद्यांवर राजकारण करणार आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक जनतेच्या प्रश्नावर लढणार आहोत."  गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार इसुदान गढवी यांनी आज आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. "इसुदान हे गुजरातचे केजरीवाल आहे," असे केजरीवाल म्हणाले. 

बाळासाहेबांना मानणारे राज ठाकरे.. राजकीय नेते म्हणून कसे आहेत ?
पुणे :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray Birthday यांचा आज वाढदिवस असून त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त विशेष पोस्ट शेअर केली आहे. "कोरोनाच्या कठिण परिस्थितीमध्ये राज ठाकरे एकमेव राजकीय नेते आहेत, त्यांनी राजकीय पोळी भाजली नाही...हे आपल्याला सतत जाणवलय...मान्य करायालाच हवं," असे केदार शिंदे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख