अमित शहांची व्हर्च्युअल सभा म्हणे 54 लाख जणांनी ऐकली...

भाजपच्या दाव्यानुसार गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारसाठी घेतलेली जनसंवाद सभा ऐकणाऱ्यांची एकुण संख्या ५४ लाख ३२ हजार ७१६ आहे. ५३ फेसबुक पेजेसवरून थेट प्रसारित करण्यात आली होती, त्याद्वारे २२ लाख १४ हजार १३६ लोकांनी सभा पाहिली. बिहारमधील ७ प्रादेशिक वाहिन्यांवरूनही प्रसारण झाले, ४४ लाख ७१ हजार ५०० व्ह्यूज मिळाले आहेत. बिहारमधील एकुण ३० हजार ९० बुथवर शहा यांच्या भाषणाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
amit shah
amit shah

नवी दिल्ली  :  यापुढचा काळ सोशल डिस्टंसिंग अपरिहार्य असणारा कोरोना काळ असणार आहे, हे ध्यानात घेताना राजकीय क्षेत्रात आभासी म्हणजे व्हर्च्युअल सभांना मोठ्या प्रमाणावर सुरूवात करुन अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने पुन्हा एकदा नव्या तंत्राचा अवलंब करण्यात  आणखी एक आघाडी घेतली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी काल आणि आज बिहार आणि ओडिशा या राज्यांसाठी घेतलेल्या सभांना मिळालेला प्रतिसाद भाजपसाठी उत्साहवर्धक आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पुढच्या आठवड्यात बिहारमधील एनडीए प्रचाराचा शुभारंभ अशाच वर्च्युअल रॅलीने करणार असून ती पाहणार्‍यांची संख्या किमान एक कोटी इतकी असावी असे भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपच्या दाव्यानुसार शहा यांनी काल घेतलेली जनसंवाद सभा ऐकणाऱ्यांची संख्या ५४ लाख ३२ हजार ७१६ आहे.

राजकीय क्षेत्रात जाहीर सभांचे महत्त्व वेगळे असते. मात्र  प्रत्यक्षात अशा सभांसाठी येणारा खर्च, त्यासाठीची साधने यांचा खर्च मोठा असतो. लोकांना सभास्थळी आणणेदेखील महत्वाचे असते. त्या तुलनेत व्हर्च्युअल सभा घेणे हा कमी खर्चाचा प्रकार असे भाजपच्या हिशोब नेतृत्वाच्या लक्षात आले आहे.

दिवंगत प्रमोद महाजन यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत दाखवलेल्या हायटेक प्रचाराच्या तसेच ““ तंत्रज्ञान आधारित पक्षबांधणी”” या वाटेने पुढे जाताना मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला वर्च्युअल सभा - बैठका - मेळावे घेण्याचा नवीन पंथ सापडला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही मोठी असून त्यातदेखील 18 कोटी सदस्यांच्या भाजपा पाठीराख्यांचा वाटा जास्त आहे.

शहा यांनी काल बिहारसाठी, तर आज ओडिषासाठी, तर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज उत्तर महाराष्ट्रासाठी अशा व्हर्च्युअल सभा घेतल्या. भाजपच्या अंतस्थ योजनेनुसार  कोरोनाचा कहर संपल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील प्रस्तावित “ ऑपरेशन कमळ” चे  ते एक द्योतक मानले जाते. भाजपच्या दाव्यानुसार गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारसाठी घेतलेली जनसंवाद सभा  ऐकणाऱ्यांची एकुण संख्या ५४ लाख ३२ हजार ७१६ आहे.  ५३ फेसबुक पेजेसवरून थेट प्रसारित करण्यात आली होती, त्याद्वारे २२ लाख १४ हजार १३६ लोकांनी सभा पाहिली. बिहारमधील ७ प्रादेशिक वाहिन्यांवरूनही प्रसारण झाले,  ४४ लाख ७१ हजार ५०० व्ह्यूज मिळाले आहेत. बिहारमधील एकुण ३० हजार ९० बुथवर शहा यांच्या भाषणाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com