धक्कादायक : गोव्यात ऑक्सिजनअभावी तीन दिवसांत ४१ रुग्णांचा मृत्यू

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हा प्रकार आहे.
41 corona patients die in goa medical hospital in three days amid oxygen shortage
41 corona patients die in goa medical hospital in three days amid oxygen shortage

पणजी : देशातील कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाला असला तरी काही राज्यांमध्ये अजूनही ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन मिळाल्याने मागील काही दिवसांत अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच गोव्यातील एका शासकीय रुग्णालयातील धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील तीन दिवसांत या रुग्णालयातील ४१ रुग्णांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. 

गोवा सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हा प्रकार आहे. गुरूवारी या रुग्णालयात ऑक्सीजन कमी झाल्याने १५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावरून आता गोव्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीच मंगळवारी २६ रुग्णांच्या मृत्यूची माहिती दिली होती.

हेही वाचा : स्पुटनिक लस आली पण पडणार महागात...कोव्हॅक्सिन व कोविशिल्डला मागे टाकले
 
गोवा रुग्णालयामध्ये मंगळवारी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मृत्यूचे तांडव झाले होते. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. रुग्णालयामध्ये १२०० ऑक्सिजन सिलिंडरची गरज असताना केवळ ४०० सिलिंडरचा पुरवठा केला गेला होता, असेही राणे यांनी मान्य केले. तर गुरूवारी १५ रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळेच मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.  तसेच दररोज २० ते २५ रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला आहे. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारे काही तांत्रिक कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या जोडणीत समस्या होती. या गोष्टींकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. केंद्र सरकारने गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा लवकर करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गोव्यातील रुग्णालयांत झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयात सुनावणी झाली. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com