मृत्यूचे तांडव थांबेना; दर तासाला देशात 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू - 4,092 deaths due to corona in 24 hours in the country | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मृत्यूचे तांडव थांबेना; दर तासाला देशात 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेने सौम्य ठरवली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची  (Covid19) दुसरी लाट थांबवण्यासाठी उशिराने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचे दृश्य देशभरात दिसत आहे. उद्रेक झाल्यानंतर विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी कोरोनाचा कहर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात दररोज चार लाखांच्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, गेल्या चार दिवसांपासून समोर येणारे मृत्यूंचे आकडे चिंता वाढवणारे आहेत. (4,092 deaths due to corona in 24 hours in the country)

देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेने सौम्य ठरवली आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर आहे. त्यामुळे देशातील कोरोना परिस्थितीचे भिषण रुप समोर येत आहे. 

जयंत पाटलांनी शब्द पाळला ; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरु

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसी दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन करून घरी परतले आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे. 

हे ही वाचा 

धक्कादायक : कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला उपस्थित गावातील 150 जणांपैकी 21 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. यातच एका कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या 150 जणांपैकी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय यंत्रणेने मात्र, यातील चौघांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे म्हटले असून, इतरांच्या मृत्यूचे वेगळे कारण दिले आहे.म 

ही घटना राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील खीरा गावात एका व्यक्तीचा 21 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या दफनावेळी 150 लोक उपस्थित होते. कोरोनाविषयक कोणत्याही उपाययोजना न पाळता त्या व्यक्तीचे दफन करण्यात आले. मृतदेहावरील प्लॅस्टिक बाजूला काढण्यात आले होते आणि अनेक जणांनी मृतदेह दफन करताना त्याला हात लावला होता.

अशी परतवणार नाशिकमध्ये कोरोनाची तिसरी लाट!
 

अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांतच गावातील लोकांचे मृत्यू होण्यास सुरवात झाली. आतापर्यंत 21 गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल बोलताना उपविभागीय अधिकारी कुलराज मीना म्हणाले की, गावातील 21 मृत्यूपैकी केवळ 3 ते 4 मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. बहुतांश मृत्यू हे वार्धक्यामुळे झाले आहेत. गावातील मृत्यू झालेल्या कुटुंबामधील 147 व्यक्तींचे आम्ही नमुने गोळा केले आहेत. कोरोनाच्या सामूहिक संसर्गामुळे हे मृत्यू झाले का याची तपासणी आम्ही करीत आहोत.   

खीरा हे गाव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा यांच्या विधानसभा मतदारसंघात आहे. त्यांनीच सोशल मीडियावर या अंत्यसंस्काराची आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूंची माहिती दिली होती. परंतु, नंतर त्यांनी ती सोशल मीडियावरुन काढली टाकली होती. त्यांनी म्हटले होते की, कोरोनामुळे 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बाधित आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख