दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू... - 25 corona patients die in Delhi due to lack of oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : दिल्लीच्या गोल्डन जयपूर हॅास्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल रात्री मध्यरात्री ही घटना घडली.

हॅास्पिटलमध्ये ३.५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मंजूरी मिळावी होती. पण शुक्रवारी रात्री १५०० लिटर रीफिलिंग करण्यात आले. हा साठाही काल रात्री संपला. पुन्हा ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही दुर्घटना घडली, गोल्डन  जयपूर  हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी.  के. बलुजा यांनी ही दिली माहिती.

गोल्डन जयपूर हॅास्पिटलमध्ये २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सर्व रुग्ण गंभीर होते. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. हॅास्पिटलमध्ये ऑक्सिजनचा दाब कमी होता. ऑक्सिजन सिलिंडर काल सांयकाळी साडेपाच वाजता पोहचणे गरजेचे होत. मात्र ते रात्री बारा वाजता पोहचले. 

शनिवारी दिल्लीतील काही रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरवठा संपला असल्याचे जाहीर केले आहे. सरोज रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे. काही रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना डिस्चार्ज केले आहे. नवीन रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून एक नोटिस काढली आहे. ''खूप प्रयत्न करूनही आम्हाला  ऑक्सिजन न मिळाल्याने आम्ही हा निर्णय घेत आहोत. सरकार आम्हाला सहकार्य करीत नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही, याचे आम्हाला वाईट वाटते.  प्रशासनाने आम्हाला हताश केले आहे,'' असे नोटीशीमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीतील काही रुग्णालय दुसऱ्या रुग्णालयातून ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्नासाठी पराकाष्टा करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना यश न मिळाले ते  हताश झाले आहेत. अमृतसरच्या नीलकंठ रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही गेल्या 48 तासांपासून ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करीत आहोत. प्रशासन सांगत आहे की सरकारी रुग्णालयानंतर खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन दिला जाणार आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख