विश्व हिंदु परिषदेचा योगी सरकारच्या विधेयकाला विरोध  -  vishwa hindu parishad objection on yogi adityanath government population control bill | Politics Marathi News - Sarkarnama

विश्व हिंदु परिषदेचा योगी सरकारच्या विधेयकाला विरोध 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळण्यापासून बंदी घातली जाईल.

लखनौ :  उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने लोकसंख्या नियंत्रण (Population Control Bill) विधेयक तयार केले आहे. या विधेयकाला विश्व हिंदु परिषदेने विरोध केला आहे.  या विधेयकावरुन विश्व हिंदु परिषदेने vishwa hindu parishad योगी सरकारवर टीका केली आहे. vishwa hindu parishad objection on yogi adityanath government population control bill
 
''या विधेयकाबाबत योगी सरकारने फेरविचार करावा,'' अशी सूचना आलोक कुमार यांनी योगी सरकारला केली आहे. ''या विधेयकामुळे समाजात लोकसंख्येचे असंतुलन निर्माण होईल,'' असे विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले. आज याबाबत ते योगी सरकारकडे तक्रार दाखल करणार आहेत. पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुतरेजा यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. ''भारतात  किंवा उत्तर प्रदेशात लोकसंख्येचा विस्फोट होत असल्याची कुठलीही माहिती नाही. कशाच्या आधारे हे विधेयक तयार केले आहे,'' असे पूनम मुतरेजा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील योगी सरकार लोकसंख्या नियंत्रण धोरणाचा मसुदा तयार केला आहे. कायदा आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबत लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. मसुद्यात म्हटले आहे की, राज्यात दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्यापासून, सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळण्यापासून बंदी घातली जाईल.
  
या लोकसंख्या नियंत्रण कायद्यानुसार, यात सेवाकाळातील अतिरिक्त बढती, बारा महिन्यांचे पालकत्व व प्रसूतीकाळातील रजा, या रजाकाळामध्येही पूर्ण वेतन आणि भत्ते यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जमा होणाऱ्या रकमेत तीन टक्के वाढीचाही समावेश यात आहे.  यामध्ये दोन मुले धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना स्थानिक निवडणुका लढविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याचबरोबर दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांना सर्व प्रकारचे सरकारी अंशदान स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे.  

''प्रचंड लोकसंख्येमुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण आणण्याचे ठरविले आहे. मात्र, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे आणणार,'' असा सवाल  समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रहमान बारक यांनी उपस्थित केला आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख