मेनका गांधींची डाँक्टरांना शिवीगाळ, आँडिओ क्लिप व्हायरल #boycottmanekagandhi ट्रेंड   -  veternary doctors in country angry over bjp mp maneka gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मेनका गांधींची डाँक्टरांना शिवीगाळ, आँडिओ क्लिप व्हायरल #boycottmanekagandhi ट्रेंड  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जून 2021

मेनका गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्दारे केली आहे.

नवी दिल्ली :  एका कुत्र्याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्या खासदार मेनका गांधी यांनी एका पशुवैद्यकीय डॅाक्टराला शिवीगाळ केल्याची आँडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. इंडियन व्हेटनरी असोसिएशनने मेनका गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्दारे केली आहे. ''मेनका गांधी या नेहमी पशुवैद्यकीय डाँक्टरांना शिवीगाळ करुन धमकी देत असतात,'' असा आरोप इंडियन व्हेटनरी असोसिएशनने या पत्रात केला आहे. veternary doctors in country angry over bjp mp maneka gandhi

चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी इंडियन व्हेटनरी असोसिएशनच्या पत्राचा दाखला देत गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''मेनका गांधी या नेहमीच फोन करुन धमकावत असतात, लोकांना खोट्या प्रकरणात अडकण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे,'' असे त्यांनी म्हटलं आहे. 

सोशल मीडियावरुन मेनका गांधी यांच्या निषेध होत आहे. मेनका यांच्यावर पशुवैद्यकीय डाँक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेनका गांधांचा निषेध, बायकाँट मेनका गांधी असा ट्रेड सध्या टि्वटवर सुरु आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. टि्वटवर मेनका गांधी यांनी माफी मागण्यासाठी ट्रेंड सुरु आहे. 
#boycottmanekagandi असा ट्रेंड सुरु आहे. नेटकरी टि्वटवर 'मेनका गांधी माफी मागा' या हॅशटॅंग सोबत त्यांनी आँडियो क्लिपही त्यासोबत शेअर करीत आहेत.
या पशुवैद्यकीय डाँक्टराची पदवी रद्द करण्याची धमकी मेनका गांधी यांनी फोनवरुन दिली आहे.  त्यांनी हरामी, हरामजादे असे शब्द वापरल्याचे क्लिपवरुन दिसते.  

काय आहे हे प्रकरण 
दिल्लीतल्या अंजली चौधरी यांच्या कुत्र्यांच्या पायाचे आँपरेशन डाँ. विकास शर्मा यांनी केलं आहे. ऑपरेशननंतर कुत्र्याच्या पायाला घातलेले टाके तुटल्याची तक्रार आली आहे. त्यानंतर  मेनका गांधी या डाँ. शर्मा यांच्यावर भडकल्या. त्यांनी डॅा. शर्मा यांना फोन करुन शिवीगाळ केली. 

 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख