पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लशीची निर्मिती केली जात आहे. कोरोना लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापराबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याबाबत अदर पूनावाला यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे.
As promised, before the end of 2020, @SerumInstIndia has applied for emergency use authorisation for the first made-in-India vaccine, COVISHIELD. This will save countless lives, and I thank the Government of India and Sri @narendramodi ji for their invaluable support.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 7, 2020
आपल्या टि्वटमध्ये अदर पूनावाला म्हणतात, ""तुम्हा सगळ्यांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट देऊन या लशीचा आढावा घेतला होता. नरेंद्र मोदींनी दिलेल्या पाठिंब्याबाबत अदर पूनावाला यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
अमेरिकेची औषध निर्माण कंपनी 'फायझर'ने शनिवारी(ता.7) केंद्र सरकारकडे कोरोना लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता द्या, अशी मागणी केली आहे. या कंपनीने देशातील औषध नियंत्रकांना (डीसीजीआय) पत्र पाठविले आहे. आपल्या कंपनीच्या लशीला भारतात वितरण, आयात व विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी 'फायझर'ने डीसीजीआयला पाठविलेल्या पत्रात केली आहे. फायइरने यापूर्वी ब्रिटन आणि बाहरीन येथे याबाबतची परवानगी मागितली आहे.
आईसीएमआरने आज (रविवार) देशात काही ठिकाणी ऑक्सफ़ोर्डच्या कोरोना लशीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची पाहणी केली आहे. भारतासह जगातील 180 देशात कोरोनाचे संकट आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 15 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 40 हजार 182 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 91 लाख नागरिक कोरोनातून मुक्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात ६८५ नवे रुग्ण
पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. ६) दिवसभरात ६८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत शहरातील ३०९ जण आहेत. काल ६६४ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८ हजार १२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये १२३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २१५, नगरपालिका कार्यक्षेत्रात ३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या एकूण मृत्यूंमध्ये शहरातील ७, पिंपरी चिंचवड चार, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही
रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.
(Edited by : Mangesh Mahale)

