मोदींनी लशींच्या कंपनीत फोटो काढले..पण नोंदणीला विलंब केला..याला जबाबदार कोण...प्रियंका गांधींचा सवाल..

लसीकरणावरुन प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवरतोफ डागली आहे.
3Sarkarnama_20Banner_20_2870_29_6.jpg
3Sarkarnama_20Banner_20_2870_29_6.jpg

नवी दिल्ली  : देशात दररोज वाढत चालेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय आहे.  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेवरून कॅाग्रेसकडून केंद्र सरकारला नेहमीच लक्ष्य केले जात आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॅा. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Narendra Modi या संकटाच्या मुकाबल्यासाठी सूचना करणारी पत्रे पाठविली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॅाग्रेसकडून नेहमीच टीका होत आहे. राहुल गांधी त्यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. लसीकरणावरुन कॅाग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा Priyanka Gandhi यांनी आज नरेंद्र मोदींवर टि्वट करुन तोफ डागली आहे. Congress general secretary Priyanka Gandhi targets Narendra Modi
 

"भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश असूनही लशींची मागणी मोदी सरकारने जानेवारीत का नोंदवली, या विलंबाला जबाबदार कोण," असा सवाल प्रिंयका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. अमेरिका व अन्य देशांनी भारतातील कंपन्यांकडे अगोदरच नोंदणी केली होती. तर मोदींनी लशींसाठी इतका विलंब का केला, असा प्रश्न प्रियंका गांधींनी विचारला आहे. मोदींनी पुण्यात सीरम कंपनीत येऊन कोरोना लशींचा आढावा घेतला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यांनी लशींची मागणी उशीरा केली, असा आरोप गांधींनी केला आहे. 

सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करताना कॅाग्रेसने राज्यशाखांना मदत कार्य राबविण्याचे आदेश दिले आहेत. तर कोरोना काळातील या मदतीवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती गट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी नेमला आहे. या कृती गटामध्ये प्रियांका गांधींचा त्याचप्रमाणे अंबिका सोनी, मुकूल वासनिक, खजिनदार पवनकुमार बन्सल, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, मनिष चत्रथ, डॅा अजोय कुमार, प्रवक्ते पवन खेडा, गुरदीपसिंग सप्पल आणि युवक कॅाग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांचाही समावेश आहे.

कॅाग्रेसच्या या कृती गटाची औपचारिक घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृती गटाच्या सदस्या असलेल्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्विट द्वारे केंद्र सरकारच्या लसीकरणावर तोफ डागली. भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजप सरकारने 12 एप्रिलला लसीकरण उत्सव साजरा केला पण लस उपलब्धतेची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे लसीकरणात 82 टक्क्यांची घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादक कंपन्यांमध्ये जाऊन फोटो काढून घेतले. परंतु, त्यांच्या सरकारने लसीची पहिली मागणी जानेवारी 2021 मध्ये का नोंदविली. अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लस उत्पादक कंपन्यांकडे बऱ्याच दिवसांपूर्वी मागणी नोंदविली होती. याची जबाबददारी कोण घेईल, असा प्रश्न प्रियांका गांधींनी केला. घरोघरी लस पोहोचत नाही तोपर्यंत कोरोनाशी लडाई अशक्य असल्याचा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com