अधिवेशनात काँग्रेस सहा विषयावर करणार मोदी सरकारची कोंडी   -   congress decides 6 points agenda during parliamentary monsoon session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अधिवेशनात काँग्रेस सहा विषयावर करणार मोदी सरकारची कोंडी  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात  मोदी सरकारची कोंडी करण्याची रणनिती  तयार करण्यात आली.

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन Monsoon Session Of Parliament ता. १९ जुलै रोजी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने आपली रणनिती  बनविली आहे. congress decides 6 points agenda during parliamentary monsoon session

यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सहा विषयांवर (6 Points Agenda)मोदी सरकारची कोंडी करण्याची रणनिती Parliamentary Strategy Group Meet तयार करण्यात आली. या बैठकीला माजी पंतप्रधानमंत्री मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, अधीर रंजन चैाधरी, मल्लिकार्जुन  खरर्गे, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी, मनीष तिवारी, वेणुगोपाल, जयराम रमेश आदी नेते उपस्थित होते. 

कृषी कायदा विरोधी आंदोलन, इंधन दरवाढ, कोरोनाचे व्यवस्थापन, विकासदर, बेरोजगारी, सीमा प्रश्न आदी विषयांवर संसद भवनात मोदीच्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरर्गे हे अन्य विरोधी पक्षासोबत या सहा विषयांबाबत समन्वय साधणार आहेत. 

लोकसभा आणि राज्यसभेत या सहा विषयावर विरोधी पक्षाचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारच्या विरोधात आपला आवाज बुलंद करतील, असे सोनिया गांधी यांनी बैठकीत सांगितले. काँग्रेसच्या सर्व खासदारांनी याबाबत अन्य विरोधी पक्षातील खासदारांशी संवाद साधावा, अशी सूचना सोनिया गांधी यांनी यावेळी केली. लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसची भूमिका एकसारखी असले, असे त्या म्हणाल्या. 

'शरद पवार राष्ट्रपती होणार' या बातम्यांमध्ये तथ्य नाही!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार Sharad Pawarहे राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक nawab malik यांनी दिली. याबाबत मलिक यांनी खुलासा केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख