शिवराज-ज्योतिरादित्य जोडी ठरली हिट; १९ उमेदवार विजयी

मध्य प्रदेशमधील प्रभावशाली नेते व शिंदे घराण्‍याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपशी घरोबा केल्यानंतरच्या काळात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने २८ पैकी १९ जागा जिंकल्या. यामुळे राज्यात त्यांचेच सरकार कायम राहील यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसला केवळ ९ जागा जिंकता आल्या.
Shivraj singh Chouhan - Jyotiraditya Scindia
Shivraj singh Chouhan - Jyotiraditya Scindia

भोपाळ : मध्य प्रदेशमधील प्रभावशाली नेते व शिंदे घराण्‍याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपशी घरोबा केल्यानंतरच्या काळात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने २८ पैकी १९ जागा जिंकल्या. यामुळे राज्यात त्यांचेच सरकार कायम राहील यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसला केवळ ९ जागा जिंकता आल्या.

ज्योतिदारादित्य शिंदे त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपच्या विजयासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्याचे फळ भाजप उमेदवारांच्या विजयातून मिळाले. शिंदे यांनी मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर २२ आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपला जवळ केले. त्यानंतर आणखी तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तीन आमदारांचे निधन झाल्याने तीन जागा रिक्त झाल्या होत्या. 

त्यामुळे राज्यात २८जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. मतमोजणीत आतापर्यंत भाजपला १९ जागांवर विजय मिळाला आहे.  यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपची सत्ता कायम राहणार हे निश्‍चित मानले जात आहे.

‘ईव्हीएम’मध्ये फेरफार : दिग्विजयसिंह
या निवडणुकीत बिहारप्रमाणेच येथेही काँग्रेसची कामगिरी सुधारली नाही. भाजपने जेथे दहा जागांवर विजय मिळविला तेथे काँग्रेसच्या पदरात एकच जागा आली तर पाच जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवराजसिंह चौहान यांनी ‘त्यांना सत्याचा स्वीकार करणे मान्य नाही’ असे प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे इंदूरमध्ये बनावट मतमोजणीचा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com