आम्हा ज्येष्ठांना नको, तरुणांना लस द्या - खर्गेंची मागणी - Congress Leader Mallikarjun Kharge Say Give Vaccine to Youth | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आम्हा ज्येष्ठांना नको, तरुणांना लस द्या - खर्गेंची मागणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मार्च 2021

कालपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली आहे. काल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये लस घेतली.

नवी दिल्ली : माझ्या सारख्या लोकांचे दहा पंधरा वर्षांचे आयुष्य उरले आहे. माझ्या पेक्षा सरकारने तरुण पिढीला कोरोनाची लस सर्वप्रथम द्यावी, अशी भूमीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली आहे. आपण कोरोनाची लस घेणार का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खर्गे यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. 

कालपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली आहे. काल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये लस घेतली.

''माझे वय आता ७० आहे. माझ्या आयुष्याची दहा पंधरा वर्षेच उरली आहेत. ज्यांना पुढे खूप आयुष्य जगायचं आहे, अशा तरुण पिढीला सर्वप्रथम लस दिली गेली पाहिजे, असे खर्गे काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पंतप्रधानांपाठोपाठ उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, विदेशमंत्री एस जयशंकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही कोरोनाची लस घेतली. 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही लस दिली जाणार आहे. पण त्यांना लस कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपचे हरियाणातील आरोग्यमंत्री अनिल विज यांनी लस घेणार नसल्याचे ट्विटवर जाहीर केले आहे. लस न घेण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, ''सामान्य जनतेसाठी कोरोना लस मिळण्यास आज  सुरूवात होणार आहे. सर्वांनी लस टोचली पाहिजे. मी तर लस घेणार नाही. कारण कोरोना झाल्यानंतर माझ्यातील अँटीबॉडी ३००झाल्या असून त्या खूप जास्त आहेत. चाचणीमध्ये मी घेतलेल्या लसीमुळे हे झाले असावे. मला आता लसीची गरज नाही.'' 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख