आठ पोलिसांच्या हत्येस जबाबदार विकास दुबे आहे तरी कोण?

उत्तर प्रदेशमध्ये विकास दुबे या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर झालेल्या गोळीबारात पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस ठार झाले आहेत. यामुळे विकास दुबे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
who is vikas dubey man behind kanpur encounter and minister killing
who is vikas dubey man behind kanpur encounter and minister killing

लखनौ : कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. 

विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तो उत्तर प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्याने 2000 मध्ये कानपूरमधील ताराचंद इंटर कॉलेजच्या सहाय्यक व्यवस्थापकाचा खून केला होता. त्याचवर्षी कानपूर कारागृहात असतानाच त्याने रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट आखला होता. नंतर 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे खून प्रकरणातही त्याचा समावेश होता. दुबेने 2018 मध्ये त्याच्या चुलतभावावरच खुनी हल्ला करवून आणला होता. 

विकास दुबेने 2002 मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. त्यामुळे कानपूर शहरासह बिलहार, शिवराजपूर, रिनयान आणि चौबेपूर या भागात त्याची दहशत आहे. काल झालेली चकमक ही चौबेपूर भागातच झाली होती. येथेच दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांना ठार केले. दुबे याचे अनेक राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. शिवराजपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत कारागृहातून निवडून येण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंद आहे. 

दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात आठ पोलिसांचा मृत्यू झाला. यात एक पोलिस उपअधिक्षकाचाही यात समावेश आहे. उत्तर प्रदेश येथे मध्यरात्री कानपूरमधील बिकारू गावात ही घटना घडली. कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी ते गेले होते. 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी अवस्थी म्हणाले की विकास व त्याच्या साथीदारांनी एका उंच ठिकाणावरून गोळ्या झाडल्याने आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विकाव दुबे याला शोधण्यासाठी पोलिस पथक रवाना झाली आहे. या गोळीबारात त्यांच्या तीन साथीदारांचा मृत्यू झाला आहे. यात चार पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. विकास दुबे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स प्रणालीच्या माध्यमातून विकास दुबे याला पोलिस शोध घेत आहे. पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात त्याला पकडण्यासाठी पथक गेले होते.  

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विकास दुबे याला पकडण्याचा आदेश दिला आहे. उत्तरप्रदेश काही सीमा बंद करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक हे देखील पोहोचले आहेत. 

विकास या बिकारु गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्या गावात येऊ नये म्हणून त्याने रस्त्यातच जेसीबी लावून ठेवला होता. त्याच्या मागून त्याने व त्याच्या साथीदाराने गोळीबार केला. देवेंद्र कुमार मिश्र, महेश यादव, अनूप कुमार, नेबूलाल, सुल्तान सिंह, राहुल जितेंद्र, बबलू  अशी मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com