पकडले जावे अशीच होती विकास दुबेची इच्छा! - Vikas Dubey Wanted to Surrender to Police | Politics Marathi News - Sarkarnama

पकडले जावे अशीच होती विकास दुबेची इच्छा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जुलै 2020

आज सकाळी विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. आता मिळालेल्या माहितीनुसार दुबेने मंदीरात येताच प्रथम २५० रुपयांची देणगीची पावती घेतली. त्यानंतर तो मंदीरात आला. त्यावेळी तो बिथरलेला होता. काही वेळातच तो मी विकास दुबे आहे, मी कानपूरचा गँगस्टर विकास दुबे, असे तो ओरडू लागला

उजैन : दोन जूनपासून उत्तर प्रदेश पोलिसांपासून दूर पळणाऱ्या गँगस्टर विकास दुबेची आपण पकडले जावे, अशीच इच्छा होती. उजैनच्या महाकाल मंदिरात त्याचे सकाळचे वर्तन तसेच होते, असे आता स्पष्ट झाले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर हे वृत्त दिले आहे. 

आज सकाळी विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. आता मिळालेल्या माहितीनुसार दुबेने मंदीरात येताच प्रथम २५० रुपयांची देणगीची पावती घेतली. त्यानंतर तो मंदीरात आला. त्यावेळी तो बिथरलेला होता. काही वेळातच तो मी विकास दुबे आहे, मी कानपूरचा गँगस्टर विकास दुबे, असे तो ओरडू लागला. सुरुवातीला तेथे बंदोबस्तासाठी असलेले सुरक्षा रक्षक व पोलिसांचा त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला महाकाल पोलिस ठाम्यात नेण्यात आले. 

कानपूरमधील आपल्या गावात २ जुलैला आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उजैनमधील महाकाल मंदिरात ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने विकास दुबे पकडला गेल्याचे सांगितले गेले होते. गेल्या २ जुलैला मध्यरात्री उत्तर प्रदेशचे पोलिस विकास दुबेला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरारी झाला होता. आज त्याला पकडण्यात आले आहे.

नाशिकमध्येही सुरु होता शोध

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरारी संशयित विकास दुबेला आज उज्जैन (मध्य प्रदेश) येथे अटक करण्यात आली. मात्र त्याच्या नाशिक कनेक्‍शनच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि नाशिकचे पोलिस त्याचा नाशिकमध्ये देखील शोध घेत होते. 

पोलिस याविषयी सावध आहेत. विशेषतः औद्योगिक वसाहतीतील भंगार आणि सशश्‍त्र सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीजशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा जोरात होती. या चर्चा आणि बातम्यांनी नाशिक पोलिस देखील सावध झाले होते. या बातम्यांत खरच तत्थ्य आहे का?. यापांसून तर तत्थ्य असलेच तर गुन्हेगार सावध होऊ नये, यामुळे पोलिसांनी यावर सगळ्यांना खातरजमा करुनच बातम्या द्याव्यात. चर्चा करु नये, असा सबूरीचा सल्ला दिला होता.  

Edited By : Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख