धक्कादायक : आठ पोलिसांना मारण्यासाठी दुबेने वापरली होती धारदार शस्त्रास्त्रे - Vikas Dubey Gang used Sharp Weapons to Kill Cops | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : आठ पोलिसांना मारण्यासाठी दुबेने वापरली होती धारदार शस्त्रास्त्रे

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जुलै 2020

गँगस्टर विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी हत्या केलेल्या आठ पोलिसांचा शवविच्छेदन अहवाल आला असून देवेंद्र मिश्रा यांच्या अंगात चार गोळ्या सापडल्या आहेत. दुबे व त्याच्या साथीदारांनी हल्ल्यासाठी बंदुकांबरोबर धारदार शस्त्रेही वापरली होती असेही निष्पन्न झाले आहे

कानपूर : एन्काउंटरमध्ये मारला गेलेला गँगस्टर विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर केला होता, अशी धक्कादायक माहिती आता या पोलिसांच्या शवविच्छेदानातून समोर आली आहे. २ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली होती.

पोलिस विकास दुबेला पकडण्यासाठी गेले त्यावेळी जेसीबी आडवा उभा करुन त्यांची वाट अडवण्यात आली. त्यानंतर या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला. त्यात सर्कल आॅफिसर देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठ पोलिस मरण पावले. त्यानंतर विकास दुबे फरारी झाला होता. या पोलिसांचा शवविच्छेदन अहवाल आला असून देवेंद्र मिश्रा यांच्या अंगात चार गोळ्या सापडल्या आहेत. दुबे व त्याच्या साथीदारांनी हल्ल्यासाठी बंदुकांबरोबर धारदार शस्त्रेही वापरली होती असेही निष्पन्न झाले आहे. या पोलिसांना एकदी जवळून गोळ्या घातल्या गेल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

२ जुलैला कानपूरमध्ये विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची हत्या केली. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. गेल्या आठवड्यात उज्जैनमधील महाकाल मंदीरात त्याला पकडण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन कानपूरकडे येत होते.  त्यावेळी त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले. एका पोलिसाचे पिस्तुल हिसकावून विकास दुबे पळून जात होता, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख