Very High Security for the Arrival of Rafael at Ambala Airbase | Sarkarnama

राफेलच्या आगमनासाठी अंबाला परिसरात कडेकोट सुरक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 जुलै 2020

फ्रान्सहून राफेल विमानांच्या आगमनाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने हवाई दलाच्या अंबाला येथील तळाच्या नजिकच्या चार गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. घरांच्या गच्चीवर जमणे किंवा विमाने उतरत असताना त्यांची छायाचित्रे घेणे यालाही मज्जाव करण्यात आला आहे. 

अंबाला : भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारातला पहिला टप्पा उद्या पूर्ण होत असून या टप्प्यात पाच राफेल विमाने भारतीय हवाईदलात दाखल होत आहेत. या विमानांच्या आगमनासाठी अंबाला विमानतळाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने हवाई दलाच्या अंबाला येथील तळाच्या नजिकच्या चार गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. घरांच्या गच्चीवर जमणे किंवा विमाने उतरत असताना त्यांची छायाचित्रे घेणे यालाही मज्जाव करण्यात आला आहे. 

भारताने फ्रान्ससोबत 36 विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५ विमाने भारतात दाखल होत आहेत. आतापर्यंत १२ लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले असून आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

आएएफच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात राफेल दाखल झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांची ताकद वाढेल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल.

२ जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात दहा ऐवजी ५ विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार ही विमाने उद्या भारतात पोहोचत आहेत. 

Edited BY - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख