वंदे भारत मोहीम आता `या` देशांतील भारतीयांसाठी

वंदे भारत मोहिमेचा पुढील टप्पा 26 मे ते 8 जून या कालावधीत पार पडणार आहे. या टप्प्यात सुमारे 23 हजार भारतीयांना मायदेशी आणले जाईल.
vande bharat mission second phase will start from 26 june
vande bharat mission second phase will start from 26 june

नवी दिल्ली : कोरोनामुळे अडकून पडलेल्या परदेशातील भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या ‘वंदे भारत’ या मोहिमेतील पुढील टप्पा २६ मे ते ८ जून या काळात पार पडणार आहे. या टप्प्यात कोरोनामुळे आखाती देशांत अडकलेल्या किमान २३ हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल. आखातात मुख्यत: केरळमधील भारतीयांची बहुसंख्या आहे. 

या काळात दुबई विमानतळावरून ५७ आणि अबुधाबी येथून २६ विमाने भारतीयांना घेऊन मायदेशी येतील. हे सध्याचे वेळापत्रक असून प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यात बदल होऊ शकतो, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात येऊ इच्छिणारांपैकी अतिशय तातडीचे व महत्त्वाचे कारण असणाऱ्या भारतीयांना प्राधान्य दिले जाईल. ‘वंदे भारत’ मोहिमेत कोरोनामुळे विदेशातच अडकलेले, परदेशात शिकणारे विद्यार्थी, नोकरदार, आयटी व्यावसायिक, वैद्यकीय कारणांमुळे भारतात परतू इच्छिणारे, महिला व बालके यांचाही विशेषत्वेकरून विचार केला जातो. याआधी संयुक्त अरब अमिरातीतून सुमारे ६००० भारतीय परत आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीतून यापूर्वी किमान १ ते सव्वा लाख भारतीयांनी नावनोंदणी केली आहे. 

२६ मे ते ८ जूनपर्यंतच्या ‘वंदे भारत’ मोहिमेत सध्या १४० विमानांसाठी मुभा देण्यात आली आहे. केरळ व्यतिरिक्त दिल्ली, गोवा, जयपूर, चंदीगड, कोलकता, अहमदाबाद, श्रीनगर, चेन्नई, मदुराई, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, कोईम्बतूर, बंगळूर या शहरांसाठी ही विमाने दुबई व अबुधाबीतून सुटतील. 

अटींची मालिका 

‘वंदे भारत’ मोहिमेमध्ये परतू इच्छिणाऱ्या विदेशातील भारतीयांना ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करण्यासह अनेक अटी पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसे शपथपत्र दिल्यावरच त्यांचे नाव अंतिम प्रवाशांच्या यादीत समाविष्ट होते. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांना घरातच १४ दिवसांचे विलगीकरण व गरज असेल तर ७ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण स्वतःच्या खर्चाने पाळणे बंधनकारक आहे. 

कोरोना उद्रेकामध्ये भारत टॉप टेन यादीत 

जगात सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत पोहोचला असून मृत्यूमुखी पडणारांच्या संख्येत इराणच नव्हे तर कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनलाही आपण मागे टाकले, ही चिंताजनक बाब मानली जात आहे. कोरोना महामारीचा भारतातील गेला आठवडाभर सुरू असलेला उद्रेक कायम असून आज सकाळपर्यंत रूग्णसंख्येचा अधिकृत आकडा एक लाख चाळीस हजारांपर्यंत पोहोचला. कोणत्याही एका दिवसातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील किमान ५-६ हजारांच्या वाढीचा कल आजही कायम राहिला. मागच्या २४ तासांत देशात नवे ६९७७ रूग्ण आढळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com