मुख्यमंत्री निगेटिव्ह आले अन् 'या' राज्याने सोडला सुटकेचा नि:श्वास

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुख्यमंत्री आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन करण्याची वेळ आली होती. अखेर मुख्यमंत्र्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
uttarakhand chief minster trivendra singh rawat tests negative for covid19
uttarakhand chief minster trivendra singh rawat tests negative for covid19

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पर्यटनमंत्र्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या चाचणीचा अहवाल आज मिळाला असून, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. 

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज हे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचबरोबर पर्यटन, जलसंपदा हे विभागही तीन दिवस बंद करण्यात आले आहेत. सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलले आहे. 

सत्पाल महाराज, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि कार्यकर्ते असे एकूण 21 जण रविवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. सत्पाल महाराज हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित मंत्री आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमवलीनुसार स्वत:चे क्वारंटाइन करण्याची गरज नाही. कारण ते सत्पाल महाराज यांच्या अगदी जवळ गेलेले नव्हते. ते सामान्यपणे काम करु शकतात. त्यांना क्वारंटाइन करण्याची कोणतीही गरज नाही. 

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि मंत्री हरकसिंह रावत, मदन कौशिक आणि सुबोध उनियाल यांनी मात्र स्वत: क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. याच काळात त्यांची कोरोना चाचणी घेतली गेली होती. हरकसिंह रावत, मदन कौशिक आणि सुबोध उनियाल हे क्वारंटाइनमधूलन काल बाहेर आले असून, त्यांनी कामकाज सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोरोना चाचणी अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिले वर्ष ऐतिहासिक निर्णयांचे  : चंद्रकांत पाटील

पुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com