'त्या'नंतर झाला विकास दुबेचा एनकाऊंटर!

एका गुन्हेगाराचा अंत झाला. पण त्याचे गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचा काय, असा प्रश्न विचारत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विकास दुबे एनकाऊंटर प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.विकास दुबे मारला गेल्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार पलटण्यापासून वाचले, अशी प्रतिक्रिया या राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे
Uttar Pradesh Police Killed Vikas Dubey in Encounter Near Kanpur
Uttar Pradesh Police Killed Vikas Dubey in Encounter Near Kanpur

लखनौ : गँगस्टर विकास दुबेला पकडल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला कानपूरला आणताना माध्यमांच्या गाड्याही पोलिसांच्या गाड्यांच्या मागावर होत्या. पण पहाटे एका विशिष्ट ठिकाणी माध्यमांच्या गाड्या थांबवण्यात आल्या आणि त्यानंतर काही वेळातच विकास दुबेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला.

२ जुलैला कानपूरमध्ये विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची हत्या केली. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. काल सकाळी उज्जैनमधील महाकाल मंदीरात त्याला पकडण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन कानपूरकडे येत होते. ज सकाळी त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले. एका पोलिसाचे पिस्तुल हिसकावून विकास दुबे पळून जात होता, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. या घटनेत चार पोलिसही जखमी झाले आहेत. 

दरम्यान, पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या माध्यमांच्या गाड्या पोलिसांनी पहाटे सहाच्या सुमारास कानपूर जवळीस सचेंडी भागात अडवल्या,चे वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिले आहे. माध्यमांच्या गाड्या थांबवल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचा ताफा पुढे गेला आणि साडेसहाच्या सुमारास विकास दुबेचा एनकाऊंटर झाला, असे या वृत्तात म्हटले आहे. 

दरम्यान, विकास दुबे मारला गेल्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार पलटण्यापासून वाचले, अशी प्रतिक्रिया या राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. दुबेला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली मोटार पलटल्यानंतर विकास दुबेचा एनकाऊंटर झाला, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. त्याला उद्देशून यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

एका गुन्हेगाराचा अंत झाला. पण त्याचे गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचा काय, असा प्रश्न विचारत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विकास दुबे एनकाऊंटर प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. दुबे सकाळी पोलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर काही वेळातच प्रियंका यांनी या प्रकरणाबाबत सवाल उपस्थित केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com