जगातील दोन महासत्ता शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर

अमेरिका आणि चीन यांच्यात मागील काही काळ सुरू असलेल्या व्यापार संघर्ष शमण्याआधीच दोन्ही देशांमध्ये इतर मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांनी झुकवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत आहेत.
us and china are on the brinks of starting new cold war
us and china are on the brinks of starting new cold war

नवी दिल्ली : कोरोना विषाणू, हाँगकाँगची स्वायतत्ता आणि अन्य मुद्दांवरुन चीन व अमेरिकेमधील तणाव वाढत असतानाच चीन- अमेरिका संबंधांवरुन अमेरिका एका नव्या शीत युद्धाच्या तयारीत असल्याचा आरोप चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी रविवारी केला. 

चीनी संसदेच्या वार्षिक अधिवेशनानिमित्त आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,‘‘अमेरिका आणि चीनमधील संबंधाच्या आडून अमेरिकेतील काही राजकीय शक्ती दोन्ही देशांना नव्या शीत युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवत आहे, असे आमच्या निर्दशनास आले आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न अत्यंत धोकादायक आहे.’’ 

‘‘अमेरिका व चीनमध्ये वेगवेगळी सामाजिक व्यवस्था आहे. यातून चीनी जनतेसमोर जे विविध पर्याय आहेत, त्याचा आदर सर्वांनी करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दोन्ही देशांमध्ये अनेक मतभेद आहेत, पण यामुळे परस्पर सहकार्यावर बिलकुल परिणाम होणार नाही, अशी भूमिकाही वँग यांनी मांडली. 
चीनच्या हिताला बाधा आणणे, चीन-अमेरिका संबंध कमी लेखत चीनमधील अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे अमेरिकेने थांबवावे, असा सज्जड इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी शनिवारी (ता. २३) अमेरिकेला दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबतचे नवे धोरण अमेरिकी काँग्रेसमध्ये नुकतेच मांडले होते. झाओ यांचे विधान हे या धोरणाला उत्तर असल्याचे मानले जात आहे. 

व्यापार, मानव अधिकार आणि अन्य काही मुद्दांवर चीन व अमेरिका या दोन महाशक्तींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असून कोरोनाव्हायरमुळे त्यात आणखी भर पडली आहे. 

कोरोनाचा स्त्रोत शोधण्यासाठी सहकार्य 

संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूंचा उगम चीनमध्ये झाला असल्याचा आरोप अमेरिकेसह अन्य देश वारंवार करीत असले तरी चीनने ते प्रत्येक वेळी ठामपणे फेटाळून लावले आहेत. आज मात्र चीनने एक पाऊल मागे घेतल्याचे दिसले. कोरोनाचा स्त्रोत शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्यास चीन तयार असल्याचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी आज स्पष्ट केले. मात्र कोणताही तपास हा राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com