यूपीएससी परीक्षेच्या 'या' आहेत तारखा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे सुधारित वार्षिक वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
upsc announces revised dates for exams
upsc announces revised dates for exams

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) सनदी सेवेची पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबरला होणार असून, मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. याआधी मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये महिन्यात होणार होती. भारतीय वन सेवेची पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबरला होणार असून, मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. 

यूपीएससी एनडीए/एन (I) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 6 सप्टेंबरला होणार आहे. दरवर्षी यूपीएससीकडून परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले जाते. यात सर्व परीक्षांच्या नियोजित वेळा देण्यात येतात. नंतर या वेळापत्रकात फारसे बदल कधी केले जात नाहीत. मात्र, यावर्षी यूपीएससीने एनडीएन आणि एनए परीक्षा (I), सनदी सेवा पूर्व परीक्षा, भारतीय वन सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस पोलिस दल परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. 

यूपीएससीने मागील महिन्यात 20 तारखेला घेतलेल्या बैठकीत देशातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला होता. तसेच, देशातील लॉकडाउनचाही विचार करण्यात आला होता. लॉकडाउनमुळे अनेक निर्बंध असल्याने सध्या परीक्षा आणि मुलाखती घेणे शक्य होणार नाही, असेही यूपीएससीने म्हटले होते. यूपीएसीकडून दरवर्षी पूर्व, मुख्य आणि मुलाखती या तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच सनदी सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवेसह (आयपीएस) अन्य इतर सेवांसाठी या परीक्षा घेतल्या जातात. यूपीएससीने अधिकृत संकेतस्थळावरही सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्षी यूपीएससी प्रामुख्याने  एनडीए, एन, सनदी सेवा, आयएफएस, आयईएस, आयएसएस या परीक्षा विविध टप्प्यांत घेणार आहे.  

राज्यपाल की मुख्यमंत्र्यांचा निर्णय कायम राहणार..?  
सोलापूर : राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना ग्रेड देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोध केला. त्यानंतर परीक्षेचा निर्णय कायद्यातील तरतूदी पाहून घेऊ, असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यामुळे परीक्षेचा पेच निर्माण झाला आहे. विद्यापीठांनी प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे आता परीक्षा होईल की नाही माहिती नाही, मात्र, विद्यार्थ्यांना त्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com