जागतिक आरोग्य संघटनेशी अखेर अमेरिकेने तोडले संबंध

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि चीनवर आगपाखड केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला दिली जाणारी मदत ही जगातील अन्य देशांच्या आरोग्य संघटनांना दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
united states exits from world health organization
united states exits from world health organization

वॉंशिंग्टन : जगभरात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, याच अमेरिकेने आता जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटनेत बदल होऊ शकले नसून, बदल घडविण्यात ही संघटना अपयशी ठरली आहे. त्यामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प म्हणाले की, वर्षाला केवळ चार कोटी डॉलर मदत दिली जाऊनही आरोग्य संघटनेवर चीनचे वर्चस्व आहे. याउलट अमेरिकेकडून ३० ते 40 कोटी डॉलर मदत दिली देण्यात येत होती. ट्रम्प यांनी चीनविरुद्ध अनेक निर्णय जाहीर केले. अमेरिकेत चीनच्या विशिष्ट गटांना प्रवेश नाकारण्यात येणार असून आणि गुंतवणूकसंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. चीनच्या सैन्याशी निगडित विद्यार्थी आणि संशोधकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेवर ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहे. कोरोना संसर्ग हाताळण्यात आरोग्य संघटनेने निष्काळीजपणा दाखवला असून, संघटनेने चीनची बाजू घेतल्याने संपूर्ण जगाला परिणाम सहन करावे लागत आहेत, असे अमेरिकेने म्हटले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर संघटनेने नवीन फाउंडेशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. यातंर्गत कोरोनाचा सामना करण्यासाठी निधी गोळा केला जाणार आहे. हा निधी मोठ्या देशांबरोबरच सामान्य नागरिकांकडून गोळा केला जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने आरोग्य संघटनेला देण्यात येणारी मदत थांबविली होती. त्यावेळी  ट्रम्प यांनी कोरोना संसर्गाचा रोखण्यास जागतिक आरोग्य संघटना अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. तसेच, चीनला मदत केल्यावरूनही ट्रम्प यांनी संघटनेवर टीका केली. त्याचबरोबर ट्रम्प यांनी आरोग्य संघटनेच्या संचालकांस पत्र लिहून एक महिन्यात संघटनात्मक बदल करण्याची मागणी केली होती. संघटनेने बदल न केल्यास अमेरिका मदत थांबवेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका 

- हाँगकाँगशी केलेला विशेष व्यापार करार संपुष्टात आणणार 
- हाँगकाँग प्रवासासाठी अमेरिकी नागरिकांना नवे प्रवास नियम 
- काही गटातील चिनी नागरिकांवर प्रवेश बंदी 
- चीनच्या गुंतवणुकीवर कठोर निर्बंध आणणार 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com